कट्टपाने बाहुबलीला का मारले? हा प्रश्न जितक्या कळकळीने विचारला गेला, तितक्याच कळकळीने धोनी निवृत्त कधी होणार? हा प्रश्न सध्या सोशल मिडीयावर विचारला जात आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी कधीकाळी जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जात होता. परंतु गेल्या काही वर्षात धोनीचा आक्रमकपणा काहीसा हरवला आहे. गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला आता खेळपट्टीवरील चेंडूही दिसत नाही, अशा शब्दात नेटकरी त्याची खिल्ली उडवत आहेत. परिणामी धोनी निवृत्त कधी होणार? ही चर्चा सध्या सोशल मीडीयावर सुरु आहे. याच चर्चेचे निमित्त साधून चेन्नई सुपर किंगच्या व्यवस्थापकांनी एक ट्विट केले आहे. धोनीच्या निवृत्तीबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी “धोनी नॉट टुडे” असे म्हटले आहे.

नेटकरी या ट्विटची तुलना लोकप्रिय मालिका गेम ऑफ थ्रोन्सशी करत आहेत. गेम ऑफ थ्रोन्सच्या आठव्या पर्वातील अंतिम भागात आर्या स्टार्कने हे वाक्य उच्चारले होते. आपला मृत्यृ डोळ्यासमोर दिसत असताना मृत्यृ बाबत उच्चारलेले हे तिचे वाक्य प्रचंड लोकप्रिय झाले होते.

नेटकऱ्यांनी या ट्विटवर दिलेल्या प्रतिक्रीया