News Flash

IND vs AUS : विराटसेनेचा नेट्समध्ये कसून सराव

रविवारपासून 2 टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात

24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 2 टी-20 आणि 5 वन-डे असं या दौऱ्याचं स्वरुप असेल. या मालिकेतला पहिला टी-20 सामना रविवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवला जाईल. या मालिकेसाठी टीम इंडियाने नेट्समध्ये कसुन सराव केला. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेमध्ये विश्रांती घेऊन पुनरागमन करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीनेही फलंदाजीचा सराव केला. याचसोबत महेंद्रसिंह धोनी, उमेश यादव हे खेळाडूही नेट्समध्ये सराव करताना दिसले.

2 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, कृणाल पांड्या, विजय शंकर, सिद्धार्थ कौल, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मयांक मार्कंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 8:26 am

Web Title: ms dhoni virat kohli sweat it out in training session before first t20i
Next Stories
1 पाकिस्तानसोबत खेळायचे की नाही याचा निर्णय सरकारच्या हातात – कपिल देव
2 एकताच्या फिरकीने भारत विजयी
3 महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराजची चमक
Just Now!
X