श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकाराने आगामी विश्वचषकासाठी धोनी भारतीय संघात असण्यावर जोर दिला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेत धोनीचा अनुभव कर्णधार विराट कोहलीसाठी महत्वाचा ठरु शकतो असं वक्तव्य संगकाराने केलं आहे. तो India Today वाहिनीशी बोलत होता. मध्यंतरीच्या काळात धोनीच्या ढासळलेला फॉर्म आणि ऋषभ पंतचं जोरदार पुनरागमन यामुळे धोनीला विश्वचषकाच्या संघात जागा मिळणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – जॉन्टी ऱ्होड्सने जाहीर केले सर्वोत्तम ५ क्षेत्ररक्षक, ‘या’ भारतीय खेळाडूला मिळालं स्थान

“विश्वचषकामध्ये अनुभवाला खूप महत्व आहे. माझ्या मते धोनीला विश्वचषकासाठी भारतीय संघात नक्की जागा मिळेल. याचसोबत अटीतटीच्या प्रसंगांमध्ये धोनीचा अनुभव विराटला कर्णधार या नात्याने चांगलाच उपयोगी पडू शकतो. या कारणासाठी धोनी भारतीय संघात असणं गरजेचं आहे.” संगकाराने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – ऋषभ पंत विश्वचषकासाठी संघात हवाच – मोहम्मद अझरुद्दीन

ज्या क्षणी धोनीच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं, त्यावेळी ऑस्ट्रेलियातील वन-डे मालिकेत धोनीने 3 अर्धशतक झळकावत दमदार पुनरागमन केलं. याचसोबत यष्टींमागे त्याची कामगिरीही ही अजुनही वाखणण्याजोगी आहे. न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी टी-20 आणि वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत धोनी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी? विचारही नको….गांगुलीचा रवी शास्त्रींना सल्ला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhonis experience will help virat kohli at the world cup says kumar sangakkara
First published on: 13-02-2019 at 15:41 IST