आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मु्ंबई इंडियन्सने नव्या पर्वासाठी नवी जर्सी समोर आणली आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरून या जर्सीचा व्हि़डिओ शेअर करण्यात आला आहे. मुंबईने नव्या जर्सीत रंगांच्या बाबतीत काही बदल आहेत. निळा आणि सोनेरी छटा असलेली ही जर्सी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

 

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. मागील हंगामात त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवले होते. इतर कोणतीही संघ त्यांची बरोबरी करू शकलेला नाही. चेन्नई सुपरकिंग्ज या यादीत दुसर्‍या स्थानावर असून त्यांनी तीनवेळा जेतेपद जिंकले आहे.

मागील दोन हंगामाचे सलग विजेतेपद जिंकत मुंबई हा आयपीएलमधील एक बलाढ्य संघ म्हमून समोर आला आहे. या वेळी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 9 एप्रिलला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध असेल. यावेळी मुंबई कशी सुरू होते, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने प्रत्येक मोसमात प्रभावी कामगिरी केली आहे. यावेळीसुद्धा  चाहत्यांनी आपल्या लाडक्या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली आहे. आरसीबीच्या संघातही अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना आयपीएलचे एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही.

मुंबईच्या संघात रोहित शर्मा, क्रुणाल पंड्या, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांसारखे मातब्बर खेळाडू आहेत. यंदाचा आयपीएल हंगाम 9 एप्रिल ते 30 मे अशा कालावधीत रंगणार आहे.

मुंबईचे नवे खेळाडू –

  • नाथन कुल्टर नाइल – 5 कोटी
  • एडम मिल्ने – 3.20 कोटी
  • पीयुष चावला 2.20 कोटी
  • युद्धवीर चरक – 20 लाख
  • मार्को जेनिसन – 20 लाख
  • अर्जुन तेंडुलकर – 20 लाख
  • जेम्स नीशम – 50 लाख