२०१९ साली होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघमालकांनी जय्यत तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाने आपल्या संघातील महत्वाच्या खेळाडूंना कायम राखत, काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. आयपीएलमध्ये चाहत्यांचा सर्वात जास्त प्रतिसाद मिळत असलेल्या संघापैकी एक मुंबई इंडियन्सनेही आगामी हंगामासाठी तब्बल १८ खेळाडूंना संघात कायम राखलं आहे. याचसोबत १० खेळाडूंना मुंबई इंडियन्सने करारमुक्त केल्याचं कळतंय.

करारमुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा जे.पी.ड्युमिनी, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. पॅट कमिन्स मागच्या हंगामात दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. याआधी मुंबई इंडियन्सने अकिला धनंजया आणि मुस्तफिजूर रेहमान यांना करारमुक्त केलं आहे.

२०१९ आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने कायम राखलेले खेळाडू –

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, अॅडम मिलने, जेसन बेहरनडॉर्फ<br />
२०१९ आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेले खेळाडू –

सौरभ तिवारी, प्रदीप सांगवान, मोहसीन खान, एमडी. निधेश, शरद लुंबा, तेजिंदर सिंह धिल्लाँ, जे.पी.ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजूर रेहमान, अकिला धनंजया