News Flash

WTC FINAL : क्रिकेट नको आता स्विमिंगची स्पर्धा करा..! नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स होतायत व्हायरल

पावसाचा हंगाम असताना साऊथम्प्टनमध्ये सामना घेण्याची गरज काय, असा सवाल आयसीसीला केला जात आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे मीम्स

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट गडद होत चालले आहे. आजपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे, पण पावसामुळे या सामन्याचा नाणेफेकीचा कौलही दुरावला आहे. इतकेच नव्हे, तर पहिले सत्रही पावसामुळे होऊ शकलेले नाही. चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी याबाबत आयसीसीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पावसाचा हंगाम असताना आयसीसीला इतका महत्त्वाचा सामना साऊथम्प्टनमध्ये घेण्याची गरज काय?, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

नेटकरी इतक्यावर न थांबता त्यांनी या सामन्याला विलंब झाल्यामुळे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल केले. पाहा लोकांनी ट्वीटरवर शेअर केलेले मीम्स –

हेही वाचा – WTC FINAL : न्यूझीलंडनं आपली ‘प्लईंग-इलेव्हन’ जाहीर न करण्याचं कारण काय?

 

 

 

 

 

 

 

 

 

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 4:54 pm

Web Title: netizens trolls icc for taking wtc final in southampton adn 96
Next Stories
1 WTC FINAL : न्यूझीलंडनं आपली ‘प्लेईंग-इलेव्हन’ जाहीर न करण्याचं कारण काय?
2 खुलासा..१०-१५ रुपयांसाठी शफाली वर्मा ठोकायची चौकार-षटकार!
3 Euro Cup 2020: इटली, बेल्जियमनंतर नेदरलँडची बाद फेरीत धडक
Just Now!
X