26 February 2021

News Flash

अखेरच्या दोन वन-डे सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा

दोन प्रमुख खेळाडूंना विश्रांती

5 सामन्यांच्या मालिकेत 0-3 अशा पिछाडीवर पडलेल्या न्यूझीलंडच्या संघाने अंतिम दोन सामन्यांसाठी संघात महत्वाचे बदल केले आहेत. डग ब्रेसवेल आणि इश सोधी यांच्याजागी यजमान न्यूझीलंडने जिमी निशम आणि टॉड अॅस्टल यांना संधी दिली आहे. मात्र दोन्ही खेळाडूंना दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आल्याचंही न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. भारतीय संघाने या मालिकेत विजयी आघाडी घेतली असल्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवत आपली प्रतिष्ठा राखण्याचं मोठं आव्हान न्यूझीलंडच्या संघासमोर असणार आहे.

अंतिम 2 वन-डे सामन्यांसाठी न्यूझीलंडचा संघ पुढीलप्रमाणे –

केन विल्यमसन (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टीन गप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), कॉलिन मुनरो, जिमी निशम, हेन्री निकोलस, मिचेल सँटनर, टिम साऊदी, रॉस टेलर

अवश्य वाचा – टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, भारतीय संघासमोर तुलनेने सोपं आव्हान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 11:35 am

Web Title: new zealand announce squad for final two odis
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 ‘त्या’ प्रसंगानंतर हार्दिकची कारकिर्द वेगळ्या उंचीवर जाईल – विराट कोहली
2 टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, भारतीय संघासमोर तुलनेने सोपं आव्हान
3 IND vs NZ : पांड्याच्या पुनरागमनामुळे भारताचा संघ परिपूर्ण – सुनील गावसकर
Just Now!
X