आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव येत्या १८ डिसेंबरला जयपूरमध्ये पार पडला जाणार आहे. बीसीसीआयने लिलावाच्या तारखेची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या हंगामात एकूण ७० खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मात्र गेली ११ वर्ष आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव करणारे रिचर्ड मेडली हे यंदाच्या हंगामात लिलावासाठी उपलब्ध नसणार आहेत. त्यांच्या जागेवर ह्युज ह्युज एडमेडेस हे बाराव्या हंगामाचा लिलाव करणार आहेत. एडमेडेस हे फाईन आर्ट आणि चॅरिटी ऑक्शनर म्हणून ओळखले जातात. एडमेडेस यांना 30 वर्ष लिलावाचा अनुभव आहे. सुरुवातीला बीसीसीआयने रिचर्ड मेडली यांना संधी न देण्यामागचं कारणं सांगितलं नव्हतं. मात्र ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर मेडली यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण देत, लिलावाना न येणं हा माझा निर्णय नसून बीसीसीआयने मला यंदा वगळल्याचं म्हटलं आहे.

मेडली यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर अनेक भारतीय चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून, तुम्ही केलेलं काम आमच्या नेहमी लक्षात राहिलं अशी भावना काही भारतीय चाहत्यांनी व्यक्त केली आहे.