News Flash

पुढच्या वेळी जरा हळू बॉल टाक ! शून्यावर दांडी गुल केलेल्या हारिस रौफला आफ्रिदीची विनंती

PSL स्पर्धेदरम्यान घडला प्रकार

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे PSL चे प्ले-ऑफ सामने स्थगित करण्यात आले होते. आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने आपले उर्वरित सामन खेळवले. रविवारी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एलिमीनेटर सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफ चर्चेचा विषय ठरला होता. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी लाहोर आणि मुलतान हे संघ रविवारी कराचीच्या मैदानात समोरासमोर आले होते.

लाहोर संघाकडून खेळताना आफ्रिकेच्या डेव्हिड वाईजने २१ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. यानंतर गोलंदाजीतही त्याने ३ बळी घेत आपलं महत्वाचं योगदान दिलं. वाईजच्या सोबतीने लाहोरकडून हारिस रौफनेही ३ बळी घेत मुलतानच्या संघाला खिंडार पाडलं. मुलतानच्या संघाकडून खेळणारा पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीचा हारिस रौफने भन्नाट इनस्विंगवर त्रिफळा उडवला….यानंतर हारिसने आफ्रिदीसारख्या मोठ्या खेळाडूला बाद करत त्याची हात जोडून माफीही मागितली. पाहा हा व्हिडीओ…

शाहीद आफ्रिदीनेही हारिसच्या चेंडूचं कौतुक करत गमतीमध्ये पुढच्या वेळी आपल्याला जरा हळू बॉल टाकण्याची विनंती केली आहे.

दरम्यान लाहोरने मुलतानवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश निश्चीत केला आहे. मंगळवारी खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात लाहोरचा सामना कराचीविरुद्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 8:57 am

Web Title: please bowl slow to me next time afridi request haris rauf after he gets out on 0 psd 91
Next Stories
1 स्मिथ-वॉर्नरमुळे विजय सोपा नसेल!
2 टोकियो ऑलिम्पिकमधील प्रत्येकाचे लसीकरण आवश्यक!
3 प्रज्ञेशला उपविजेतेपद
Just Now!
X