News Flash

पृथ्वी शॉ म्हणतोय ‘अपना टाइम आयेगा’, दुखापतीवर मात करत पुनरागमन करण्याचा निर्धार

'अपना टाइम आयेगा...इंजुरीसे फिट होके...मै और रन बनायेगा'

पायाला झालेल्या दुखापतीमधून भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ सावरत आहे. दुखापतीमुळे पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेला मुकावं लागलं होतं. मात्र लवकरच आपण पूर्ण फिट होऊन मैदानात परतून धावा करु असा विश्वास पृथ्वी शॉने व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिका सुरु होण्याआधीच सरास सामन्यादरम्यान पृथ्वी शॉच्या पायाला दुखापत झाली होती.

पृथ्वी शॉने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे आपण पुनरागमन करु हे सांगताना त्याने सध्या हिट असलेल्या ‘गली बॉय’ चित्रपटातील ‘अपना टाइम आयेगा’ गाणं वापरलं आहे. पृथ्वी शॉने आपला फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘अपना टाइम आयेगा…इंजुरीसे फिट होके…मै और रन बनायेगा…अपना टाइम आयेगा’.

दुखापत झाल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत पृथ्वी शॉ फिट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र दुखापतीतून न सावरल्याने पृथ्वी शॉला मायदेशी परतावं लागलं. यामुळे पृथ्वी शॉच्या जागी मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. मयांक अग्रवालने आपल्या कसोटी कारकिर्दीला यशस्वी सुरुवात करत दोन सामन्यात दोन अर्धशतकांच्या मदतीने 195 धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 3:55 am

Web Title: prithvi shaw saying apna time ayega
Next Stories
1 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राचा ‘अजिंक्य’तेचा नारा!
2 सलग चौथ्या विजयाचे भारताचा निर्धार
3 राखीव खेळाडूंनाही सामन्यांचा सराव अत्यावश्यक -श्रीधर
Just Now!
X