28 September 2020

News Flash

करोनाशी लढा : मराठमोळा कबड्डीपटू श्रीकांत जाधव गरजू व्यक्तींच्या मदतीला

गावातील गरजू व्यक्तींना दिलं मोफत धान्य

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. सध्याच्या घडीला देशातली परिस्थिती पाहता हे लॉकडाऊन वाढवलं जाण्याची शक्यताही आहे. जिवनावश्यक गोष्टींचा अपवाद वगळता सर्व गोष्टी या काळात बंद राहणार आहेत. मात्र या लॉकडाऊनचा देशातील अनेक रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना, गोर-गरिबांना फटका बसला आहे. अशा खडतर काळात अनेक क्रीडापटू गरजूंच्या मदतीसाठी समोर येत आहेत.

मराठमोळा कबड्डीपटू श्रीकांत जाधवने या काळात आपल्या गावातील गरजू व्यक्तींना मोफत धान्यवाटप केलं आहे. श्रीकांत अहमदनगर जिल्ह्यातील शेगावचा रहिवासी आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये श्रीकांत रेल्वेच्या संघाचं प्रतिनिधीत्व करतो. तर प्रो-कबड्डीत श्रीकांत यूपी योद्धा संघाकडून खेळतो.

View this post on Instagram

With all the blessings of God, I pledge to distribute some of the rations to needy families who are struggling to feed their families during this tough time residing in our locality due to Covid-19 One hands towards another #staysafe #stayinhome and #staypositive

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 2:33 pm

Web Title: pro kabadaai star shrikant jadhav help poor families during lockdown psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 IPL करारासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू विराटला स्लेजिंग करायला घाबरायचे !
2 प्रेक्षकांविना आयपीएल खेळवण्यास हरभजन सिंहचा पाठींबा
3 ‘ढिंच्यॅक पूजाला तुझी जोडीदार बनव…’; युझवेंद्र चहलला चाहत्याची कोपरखळी
Just Now!
X