09 July 2020

News Flash

पुणे चारीमुंडय़ा चीत

पूर्वार्धात आघाडी घेऊनही त्याचा फायदा उचलण्यात पुणेरी पलटण अपयशी ठरले. त्यामुळेच त्यांना प्रो कबड्डी लीगमध्ये बंगळुरू बुल्स संघाविरुद्ध २६-३१ असा पराभव स्वीकारावा लागला.

| July 26, 2015 05:36 am

पूर्वार्धात आघाडी घेऊनही त्याचा फायदा उचलण्यात पुणेरी पलटण अपयशी ठरले. त्यामुळेच त्यांना प्रो कबड्डी लीगमध्ये बंगळुरू बुल्स संघाविरुद्ध २६-३१ असा पराभव स्वीकारावा लागला.

चुरशीने झालेल्या या लढतीत पूर्वार्धात पुणे संघाने १३-१२ अशी नाममात्र आघाडी मिळविली होती, मात्र उत्तरार्धात बंगळुरू संघाने विजयश्री खेचून आणली. त्यांनी २७व्या मिनिटाला लोण चढवला. पुणे संघाचा आधारस्तंभ व कर्णधार वझीर सिंगच्या पकडी कशा जास्तीत जास्त होतील, ही रणनीती बंगळुरूने उत्तरार्धात आखली. त्याचाच फायदा त्यांना झाला. त्यातच दुखापत झाल्यामुळे अपेक्षेइतका प्रभाव वझीर याला दाखवता आला नाही. तसेच त्यांचा आणखी चढाईपटू प्रवीण नेवाळेलाही फारसे यश मिळाले नाही.

दिल्लीची बंगालवर मात
जोरदार चढाया व उत्कृष्ट पकडी असा खेळ करीत दिल्ली दबंगने बंगाल वॉरियर्सवर ३२-२१ असा सहज विजय मिळवला. पूर्वार्धात दिल्ली संघाने १५-१० अशी आघाडी मिळवली होती. सुरुवातीच्या बरोबरीनंतर त्यांनी १६व्या मिनिटाला पहिला लोण चढवला. बंगाल चे तीन खेळाडू जखमी झाल्यामुळे त्याचा फटका त्यांना चढायांमध्ये जाणवला.

आजचे सामने
जयपूर पिंक पँथर्स वि. पाटणा पायरेट्स
तेलुगू टायटन्स वि. यू मुंबा
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2015 5:36 am

Web Title: pune losse the match
Next Stories
1 कसोटी सामना अनिर्णीत
2 पुनरागमन कठीणच
3 श्रीशांतसह ३६ आरोपींची निर्दोष मुक्तता
Just Now!
X