भारताचा माजी यष्टीरक्षक सईद किरमाणीने जाहीर केलेल्या कर्नाटकच्या सार्वकालिन सर्वोत्तम कसोटी संघात राहुल द्रविड आणि जी. आर. विश्वनाथ यांच्यासह १२ खेळाडूंचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद यांनाही या संघात स्थान देण्यात आले आहे.
‘‘प्रत्यक्ष सामन्यात प्रसन्ना किंवा चंद्रा यांना विश्रांती देण्याचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. त्यामुळे श्रीनाथ किंवा प्रसाद या वेगवान गोलंदाजांपैकी एकाला विश्रांती द्यावी लागेल,’’ असे किरमाणीने सांगितले. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) अमृतमहोत्सावानिमित्त किरमाणी बोलत होता. किरमाणीने या कसोटी संघाचे नेतृत्व वेंकटरामन सुब्रमण्याकडे सोपवले असून, यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वत:कडेच राखली आहे.
संघ : वेंकटरामन सुब्रमण्या (कर्णधार), रॉजर बिन्नी, राहुल द्रविड, जी. आर. विश्वनाथ, ब्रिजेश पटेल, सईद किरमाणी (यष्टीरक्षक), सुनील जोशी, अनिल कुंबळे, इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद.