News Flash

‘‘असं म्हणू नकोस, माझं मन…”, रवीचंद्रन अश्विननं घेतली मांजरेकरांची फिरकी!

तमिळ चित्रपटातील फोटो शेअर करत दिलं प्रत्युत्तर

रवीचंद्रन अश्विन आणि संजय मांजरेकर

टीम इंडियाचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने आपल्या ट्विटवरून संजय मांजरेकर यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. अश्विनने ट्विटरवर तमिळ चित्रपटातील एक फोटो शेअर केला, यात अभिनेता विक्रम आपल्या मित्राला ‘असं म्हणू नकोस, माझं मन दुखावत आहे’ असे सांगत आहे. अश्विनने संजय मांजरेकर यांना या चित्रपटातील एका दृश्याच्या माध्यमातून टोमणा मारला आहे. आतापर्यंतच्या महान गोलंदाजांच्या यादीत अश्विनला मानत नसल्याचे मांजरेकरांनी म्हटले होते.

हेही वाचा – इंग्लंडचं चाललंय काय? निलंबित रॉबिन्सनच्या पर्यायी खेळाडूचेही वादग्रस्त ट्वीट होतायत व्हायरल!

‘‘ऑलटाइम ग्रेट’ ही एखाद्या क्रिकेटपटूला दिलेली सर्वोच्च प्रशंसा आहे. डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावसकर, तेंडुलकर, विराट इत्यादी क्रिकेटपटू माझ्या पुस्तकात महान आहेत. सन्मानपूर्वक, अश्विन अद्याप सार्वकालिन महान खेळांडूंमध्ये मोडत नाही”, असे संजय मांजरेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते. त्यानंतर या प्रकरणावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या.

 

रवीचंद्रन अश्विनने कसोटीच्या एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी ३० वेळा केली आहे. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानी आहे. अश्विनने टीम इंडियाकडून ७८ कसोटी सामन्यांमध्ये ४०९ बळी घेतले आहेत.

हेही वाचा – पाकिस्तान सुपर लीगपूर्वी ‘स्टार’ क्रिकेटपटू झाला रक्तबंबाळ, तोंडाला पडले ७ टाके!

मांजरेकरांचे अव्वल १० गोलंदाज

संजय मांजरेकर यांनी सोमवारी आपल्या अव्वल १० गोलंदाजांची नावे ट्वीट केली, त्यात फक्त एक भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. रिचर्ड हॅडली, मालकॉम मार्शल, कर्टली एंब्रोस, वसीम अक्रम, शेन वॉर्न, ग्लेन मॅक्ग्रा, डेन स्टेन, जेम्स अँडरसन, मुथय्या मुरलीधरन आणि कपिल देव हे संजय मांजरेकरचे अव्वल १० गोलंदाज आहेत. मांजरेकर यांनी अनिल कुंबळे, इम्रान खान यांच्यासारख्या दिग्गजांनासुद्धा या यादीमध्ये स्थान दिले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 2:02 pm

Web Title: ravichandran ashwin reacts on sanjay manjrekar on not all time great tweet adn 96
Next Stories
1 इंग्लंडचं चाललंय काय? निलंबित रॉबिन्सनच्या पर्यायी खेळाडूचेही वादग्रस्त ट्वीट होतायत व्हायरल!
2 पाकिस्तान सुपर लीगपूर्वी ‘स्टार’ क्रिकेटपटू झाला रक्तबंबाळ, तोंडाला पडले ७ टाके!
3 लंकेला नेस्तनाबूत करण्यासाठी टीम इंडिया सज्ज..! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक आले समोर
Just Now!
X