01 October 2020

News Flash

रोहित शर्माचा पहिला चेक किती रुपयांचा होता माहिती आहे?

ट्विटरवर प्रश्नोत्तरांच्या सत्रात रोहितनेच उलगडलं गुपित

करोना विषाणूमुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली असली तरी भारतीय खेळाडू अजूनही घरातच आहेत. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या IPLमध्ये खेळण्यासाठी सारे सज्ज होत आहेत. पण २० ऑगस्टपर्यंत खेळाडूंना घरातच बसून राहायचे आहे, त्यामुळे खेळाडू आपापल्या घरी विश्राम घेत आहेत. अशा काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने नुकतेच ट्विटरवर प्रश्नाोत्तरांचं सत्र घेतलं. त्यात रोहितने वैयक्तिक आयुष्यापासून ते क्रिकेटबद्दलची सगळी उत्तरं दिली.

ट्विटरवरील या प्रश्नोत्तरांच्या सत्रात एका चाहत्याने रोहितला पहिल्या कमाईबद्दल प्रश्न विचारला. “तुला क्रिकेट खेळताना पहिला चेक कधी मिळाला होता? तो चेक किती रूपयांचा होता? आणि त्या पैशाचं तू काय केलंस?”, असा सवाल एका चाहत्याने रोहितला केला. त्यावर रोहितने छान उत्तर दिलं. “माझा पहिला चेक (धनादेश) हा खरं तर चेक स्वरूपात नव्हता. मला रोख बक्षीस म्हणून मिळाले होते. मी आमच्या सोसायटीजवळच मित्रांबरोबर खेळताना मला ते पैसे मिळाले होते. ते बक्षीस होतं ५० रूपये. मी त्या पैशातून सगळ्या मित्रांसोबत जाऊन टपरीवरचा वडापाव खाल्ला होता”, असे रोहितने सांगितले.

याच प्रश्नांमध्ये त्याला असंही विचारण्यात आलं होतं की जर तुला मुंबई इंडियन्सच्या निवृत्त खेळाडूंपैकी एका खेळाडूला संघात पुन्हा घ्यायची संधी मिळाली तर तू कोणाची निवड करशील? या प्रश्नावर रोहितने अगदी झकास उत्तर दिलं. रोहित म्हणाला, “जर मला अशी संधी देण्यात आली तर मी एकाऐवजी दोन खेळाडूंना संघात परत घेईन. ते दोन खेळाडू म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॅक.” रोहितने या व्यतिरिक्तदेखील अनेक प्रश्नांची खुमासदार उत्तरं दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 9:17 am

Web Title: rohit sharma reveals the amount of his first paycheck in cricket and he spent it all eating vada pav with friends on twitter video vjb 91
Next Stories
1 वयचोरीच्या कबुलीला माफी!
2 द्रविड ‘बीसीसीआय’च्या कोव्हिड कृती दलाचा प्रमुख?
3 भारताच्या बॅडमिंटनसाठी सोपे वेळापत्रक
Just Now!
X