News Flash

Father’s Day 2020 : सचिन तेंडुलकर रमला बाबांच्या आठवणींमध्ये…

सोशल मीडियावर शेअर केला जुना फोटो

Father’s Day 2020 : सचिन तेंडुलकर रमला बाबांच्या आठवणींमध्ये…

जगभरात आज फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या वडिलांचं खास महत्व असतं. मोठं होऊन आपणही आपल्या बाबांसारखी काम करावं असं प्रत्येक मुलाला मनोमन वाटत असतं. भारतीय क्रिकेटचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या जडणघडणीतही त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये सचिनने आपल्या वडिलांचा आयुष्यावर असलेल्या प्रभावाबद्दल भाष्य केलं आहे.

जगभरात आज फादर्स डे साजरा केला जात असताना सचिननेही, आपल्या वडिलांसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत एक खास संदेश लिहीला आहे. तुम्ही दिलेला सल्ला आणि तुमचे संस्कार मी कायम लक्षात ठेवीन असं सचिनने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सचिनसोबत अजिंक्य रहाणेनेही आपल्या वडिलांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंसह अनेक मोठ्या सेलिब्रेटीही आज सोशल मीडियावर आपल्या बाबांविषयी व्यक्त होत आहेत.

अवश्य वाचा – बाबांनी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, अजिंक्यने शेअर केला बाबांसोबत लहानपणीचा फोटो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 11:30 am

Web Title: sachin tendulkar remembers his father and his advice on fathers day psd 91
Next Stories
1 बाबांनी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, अजिंक्यने शेअर केला बाबांसोबत लहानपणीचा फोटो
2 ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी प्रेक्षकांना प्रवेश!
3 टोक्यो ऑलिम्पिकला सद्य:स्थितीत प्रायोजक अवघड!
Just Now!
X