News Flash

एक फटका हुकला…अन् वानखेडे सुन्न!

'सचिन.. सचिन..' हा नाद वानखेडे स्टेडियमवर काल गुरूवार दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांपासून तब्बल ८२ मिनिटे आसमंतात घुमत होता.

| November 15, 2013 11:57 am

क्रिकेटच्या व्यासपीठावरील महानायक सचिन तेंडुलकरने आपला अखेरचा अंकसुद्धा तितकाच संस्मरणीय पद्धतीने साकारण्याचे मनात पक्के केले होते. त्याच्या प्रत्येक फटक्यांची नजाकत क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. ‘सचिन.. सचिन..’ हा नाद वानखेडे स्टेडियमवर काल गुरूवार दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांपासून तब्बल ८२ मिनिटे आसमंतात घुमत होता.
.. अख्ख्या रिकी कुटोला सचिनने बॅगमध्ये भरले होते!
वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत असताना सचिनने चेतेश्वर पुजारासोबत दिवसअखेपर्यंत किल्ला लढवला. त्यामुळेच वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील १८२ धावसंख्येला भारताने २ बाद १५७ असे समाधानकारक प्रत्युत्तर दिले होते.
हा जिमखाना युवा खेळाडूंसाठी योग्य व्यासपीठ -सचिन
त्यानंतर आज शुक्रवार वानखेडेच्या मैदानावर पुन्हा सचिन फलंदाजीला येणार त्यामुळे आजही तितकीच गर्दी वानखेडे बाहेर जमली होती. तोच जल्लोष आणि मनात एकच इच्छा सचिनचे शकत व्हावे..
वानखेडेवरील घडाळ्यात साडेनऊ वाजले आणि क्रिकेटवीर सचिन मैदानात उतरला..आसमंतात सचिन नावाचा जयघोष घुमू लागला. सचिनच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक फटका धावांचा भूकेला असल्यासारखाच दिसत होता. त्यामुळे आज सचिनचे शतक होणार या उत्कंठेने प्रेक्षकांच्या नजरा सचिनवर खिळून बसल्या होत्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर सचिन पोहोचताच..
हृदयाच्या ठोक्याप्रमाणे संपूर्ण स्टेडियम प्रत्येक चेंडुनंतर धडधडत होते. सचिनने शानदार स्ट्रेट ड्राईव्ह चौकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि प्रथम स्टेडियमवर उपस्थित असलेल्या आपल्या आई रजनी तेंडुलकर यांना बॅट दाखवून अभिवादन केले. त्यानंतर प्रेक्षकांना बॅटची सलामी दिली. अर्धशतक झाल्यानंतरच्या अवघ्या पंधरा मिनिटांत सचिन ७४ धावांवर पोहोचला. त्याच्या तडफदार खेळीने आज काहीतरी अजब रसायन पहायला मिळणार असे वाटत असतानाच देवनारायणच्या चेंडुवर सचिन झेल बाद झाला आणि वानखेडे सुन्न…!!
सचिननेच सुचविले होते धोनीचे नाव- शरद पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 11:57 am

Web Title: sachin tendulkars 74 runs in his 200th test match
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 अश्विन, ओझाच्या घावाने दुसऱया दिवसाचा शेवट; विंडिजचे तीन फलंदाज तंबूत
2 लगे रहो सचिन!
3 सचिनोत्सव!
Just Now!
X