07 July 2020

News Flash

सायना नेहवालला जेतेपदाची खात्री

गतविजेत्या सायना नेहवालला थायलंड ग्रां. प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची खात्री वाटत असून, अजय जयराम व सौरभ वर्मा यांच्यावरही भारताची भिस्त आहे. या स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत

| June 4, 2013 03:42 am

अजय जयराम, सौरभ वर्मा यांच्यावरही भारताची भिस्त
थायलंड ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धा
गतविजेत्या सायना नेहवालला थायलंड ग्रां. प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची खात्री वाटत असून, अजय जयराम व सौरभ वर्मा यांच्यावरही भारताची भिस्त आहे. या स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.
दुखापतीमुळे सुदीरमन चषक स्पर्धेत सायनाला भाग घेता आला नव्हता. थायलंड स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी तिने गेले काही दिवस कसून सराव केला आहे. तिला पहिल्या फेरीत चीन तैपेईच्या शिहहान हुआंग हिच्याशी खेळावे लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत तिला अनुकूल ड्रॉ लाभला आहे. भारताच्या पी. व्ही. तुलसी हिला तृतीय मानांकित पोर्नतिपबरोबर खेळावे लागणार आहे. अरुंधती पानतावणे हिला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूचे आव्हान असेल.
पुरुषांच्या एकेरीत जयरामच्या पुढे शिसेर हिरेन रुस्ताव्हिटो याचे आव्हान आहे. सौरभ वर्मा याला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूबरोबर खेळावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2013 3:42 am

Web Title: saina nehwal sure on victory
टॅग Saina Nehwal,Sports
Next Stories
1 पाटर्य़ा, चीअर लीडर्सवर बंदीची शक्यता
2 धोनीचा पाय आणखी खोलात!
3 बिंद्रांनी केलेले आरोप श्रीलंका मंडळाला अमान्य
Just Now!
X