News Flash

..तर दुसऱ्या फेरीत सायना-सिंधूचा सामना

इंडोनेशिया खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेतील महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तीन वेळा विजेत्या सायना नेहवालची भारताच्याच पी. व्ही. सिंधूशी गाठ पडणार आहे.

| May 25, 2015 02:53 am

..तर दुसऱ्या फेरीत सायना-सिंधूचा सामना

इंडोनेशिया खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेतील महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तीन वेळा विजेत्या सायना नेहवालची भारताच्याच पी. व्ही. सिंधूशी गाठ पडणार आहे.
जागतिक क्रमवारीच्या अव्वल स्थानावरील सायनाला स्पध्रेसाठी दुसरे मानांकन दिले आहे. सायनाची पहिल्या फेरीत थायलंडच्या निकाओन जिंदापोनशी लढत होणार आहे. आतापर्यंत सायनाने तिन्ही लढतींत जिंदापोनला पराभूत केले आहे.
सिंधूची पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या सू या चिंगशी गाठ पडणार आहे. सिंधूने २७व्या स्थानावरील असलेल्या चिंगला हरवल्यास तिचा सायनाशी सामना होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2015 2:53 am

Web Title: saina sindhu clash likely at indonesia open
टॅग : Indonesia Open
Next Stories
1 रत्नागिरीच्या ‘अपेक्षा’ उंचावल्या!
2 व्हॅलेन्सिया चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणार
3 दक्षिण-पश्चिम मुंबई अजिंक्य
Just Now!
X