23 August 2019

News Flash

स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडचे नवे ‘आर्चर’स्त्र

दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीला आजपासून लॉर्ड्सवर सुरुवात

दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीला आजपासून लॉर्ड्सवर सुरुवात

अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका

लंडन : एजबॅस्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने दोन्ही डावांत झुंजार शतक साकारून ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या लढतीत स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडचा संघ जोफ्रा आर्चर नामक वेगवान अस्त्राचा वापर करणार आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत इंग्लंडला २५१ धावांनी धूळ चारली. चेंडू फेरफार प्रकरणात दोषी ठरल्यामुळे निलंबनाची शिक्षा भोगून दीड वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या स्मिथने अनुक्रमे १४४ व १४२ धावा करून इंग्लंडला झगडायला लावले. मॅथ्यू वेडने दुसऱ्या डावात शतक साकारत ऑस्ट्रेलियाला दिलासा दिला. परंतु सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्राफ्ट यांना कामगिरी सुधारण्याची आवश्यकता आहे.

* सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी.

First Published on August 14, 2019 3:12 am

Web Title: second ashes test begins today at lords ground zws 70