News Flash

सिंधू, प्रणॉय तिसऱ्या फेरीत

पी.व्ही. सिंधू आणि एच.एस. प्रणॉय यांनी मकाऊ बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली.

पी. व्ही. सिंधू

पी.व्ही. सिंधू आणि एच.एस. प्रणॉय यांनी मकाऊ बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. मात्र अजय जयरामला पराभवाला सामोरे जावे लागले. पाचव्या मानांकित सिंधूने कोरियाच्या किम ह्य़ो मिनवर २१-१३, २२-२० असा विजय मिळवला. पुरुषांमध्ये सातव्या मानांकित प्रणॉयने तैपेईच्या लिन चिआ ह्युसानवर २१-१९, २१-१५ अशी मात केली. बी.साईप्रणीतने उझबेकिस्तानच्या आटय़रेम सॅव्हटय़ुगिनला २१-११, २१-८ असे नमवले. चीनच्या लिन गिपूने अजयवर २१-११, २१-१७ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत जपानच्या युकी फुकूशिमा आणि सायाका हिरोता जोडीने ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा २१-१६, २१-१५ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2015 5:22 am

Web Title: sindhu pranoy achieve third round
टॅग : Sindhu
Next Stories
1 बार्सिलोना बाद फेरीत
2 मुंबईचे संघ उपांत्य फेरीत समोरासमोर
3 महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत
Just Now!
X