News Flash

पांड्याने कर्णधार कोहलीलाही मागे टाकले

सर्वाधिक षटकार हार्दिकच्या नावे

हार्दिक पांड्या

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात ९६ चेंडूत ८ चौकर आणि ७ षटकाराच्या मदतीने १०८ धावा करत हार्दिक पांड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दमदार खेळीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले. या सामन्यात हार्दिक पांड्याने ७ षटकार खेचत कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. पदार्पणाच्या पहिल्या कसोटीत सर्वाधिक तीन षटकार खेचणारा पहिला भारतीय फलंदाज ठरल्यानंतर तिसऱ्या कसोटीत पांड्याने कर्णदधार विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला. हार्दिक पांड्याने या सामन्यातील ७ षटकारांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर्षी २६ षटकार ठोकले आहेत. यंदाच्या वर्षात आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीच्या नावे १९ षटकार आहेत.

यंदाच्या वर्षी सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत पहिल्या पाच भारतीयांमध्ये  रवींद्र जाडेजा (१४), महेंद्रसिंग धोनी (१३) आणि युवराज सिंह (१०) यांचा समावेश आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी हार्दिक पांड्या नावाच वादळ श्रीलंकच्या मैदानावर वाहताना दिसले. कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरलेल्या पांड्यान कँडीच्या मैदानावर पहिलं कसोटी शतक झळकावले. या शतकासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने आपल स्थान पक्क केल. यापूर्वी कपील देव आणि मोहम्मद अझरुद्दीन (७४), वीरेंद्र सेहवाग (७८) आणि शिखर धवन (८५) चेंडूत शतक झळकावले होते. सर्वाधिक जलद कसोटी शतक ठोकणारा हार्दिक पांड्या हा पाचवा फलंदाज ठरला.

हार्दिक पांड्याच्या रुपाने भारताला कपिल देव यांच्यासारखा अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे, असे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी नुकतेच म्हटले होते. कपिल यांनी १९९४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्यानंतर भारताला तडफदार फलंदाजी आणि वेगवान मारा करणारा अष्टपैलू खेळाडू मिळाला नाही. इरफान पठाणने काही काळ मैदानात अष्टपैलू खेळी केली. पण दुखापतीमुळे संघातून बाहेर गेल्यानंतर फॉर्म न गवसल्याने त्याला संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नी भारतीय संघात अष्टपैलू नावलौकिक मिळवेल, असे वाटत होते. पण त्यालाही भारतीय संघात जास्त काळ तग धरता आला नाही. आता हार्दिक पांड्याच्या रुपाने भारतीय संघातील अष्टपैलूची अपेक्षापूर्ती होईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांसह दिग्गजांमध्येही निर्माण झाली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 4:51 pm

Web Title: sl vs ind 3rd test india tour of sri lanka 2017 indian cricketer hardik pandya hit most sixes in this year virat kohli
Next Stories
1 संघात निवड न झाल्याने अश्विनचा ‘या’ संघाकडून खेळण्याचा निर्णय
2 ‘मेस्सी जैसा कोई नहीं’ चाहत्यांकडून रोनाल्डोचं ट्रोलिंग
3 गावसकरांच्या ‘या’ मताशी तुम्ही सहमत आहात का?
Just Now!
X