इंग्लंडमध्ये १९९९ साली झालेल्या विश्वचषकानंतर भारताच्या संघाची जबाबदारी सौरव गांगुलीकडे आली. गांगुलीने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर तो आक्रमकपणे मैदानावर संघाचे नेतृत्व करायचा. २००२ साली त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली. त्या स्पर्धेचे विजेतेपद श्रीलंका आणि भारत यांना विभागून देण्यात आले. सामन्याचा दिवस आणि राखीव दिवस अशा दोनही दिवशी पाऊस पडल्याने सामना दोन्ही वेळा मध्यातच थांबवावा लागला. त्यापैकी एका सामन्यात सौरव गांगुली आणि श्रीलंकेचा रसल अरनॉल्ड यांच्यात मैदानावर थोडीशी बाचाबाची झाली होती. त्याबाबतची आठवण अरनॉल्डने फिरकीपटू अश्विनशी बोलताना लाइव्ह चॅटवर सांगितली.

“विराट सर्वोत्तम; बाबर आझम आसपासही नाही”; पाकिस्तानी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

२००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची गोष्ट आहे. आम्ही श्रीलंकेत खेळत होतो. आमच्या संघाने २०० च्या आसपास मजल मारली होती. त्यावेळी मी खेळताना बॅटने हळूच एक ‘लेट कट’ खेळलो आणि गोलंदाजाला हुल देण्यासाठी दोन-तीन पावलं पुढे आलो. (पण ती दोन तीन पावलं मी खेळपट्टीच्या प्रतिबंधित क्षेत्रात टाकली) १८ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, पण मला आजही नीट आठवतंय. द्रविडने गांगुलीला ती गोष्ट सांगितल्यावर गांगुली लगेच मला ओरडला. काहीतरी बोलायला लागला. तेवढ्यात द्रविड आला आणि मला ‘खेळपट्टीच्या त्या भागातून धावू नकोस’ असं सांगून गेला. बस्स.. तेवढंच झालं. आमचं मोठं भांडण झालं नाही. फक्त थोडी बाचाबाची झाली”, अशी आठवण अरनॉल्डने सांगितली.

ICC च्या ट्विटवर सचिन, गांगुलीचा अफलातून रिप्लाय

गांगुलीच्या स्वभावाबाबतही त्याने काही गंमतीशीर गोष्टी सांगितल्या. “जेव्हा आम्ही सौरव गांगुलीसोबत खेळायचो, तेव्हा एक लक्षात आलं की तो खूप आक्रमक आहे. तुम्ही जसं वागाल, तसं तो तुमच्याशी वागतो. त्यामुळेच त्याला उकसवणं खूप सोपं आहे, कारण प्रत्युत्तर द्यायला त्याला आवडतं, पण हे सारं खेळापुरतं मर्यादित आहे”, असंही अरनॉल्ड म्हणाला.