अबू धाबी : टाळेबंदीच्या काळात जवळपास पाच महिने कुटुंबियासोबत वेळ घालवल्यानंतर दुबईतील विलगीकरणाचे पहिले सहा दिवस फार आव्हानात्मक होते, अशी प्रतिक्रिया चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली. ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार खेळाडूंना दुबई येथे सहा, तर अबू धाबी येथे १४ दिवसांचे विलगीकरण करणे अनिवार्य होते. यादरम्यानच चेन्नईच्या दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे चेन्नईला सरावाला प्रारंभ करण्यासाठी १४ दिवस प्रतीक्षा करावी लागली. ‘‘दुबईत दाखल झाल्यावर सुरुवातीचे सहा दिवस फार कठीण होते. कुटुंबियांपासून दूर एका वेगळ्याच खोलीत रहावे लागल्याने मी सुरुवातीला बैचेन होतो. परंतु काही दिवसांनी स्वत:ला विविध गोष्टीत मग्न ठेवण्याची सवय झाली,’’ असे धोनी म्हणाला.

लोकप्रियतेत धोनी सचिन, कोहलीपेक्षा सरस

भारतातील चाहत्यामध्ये असणाऱ्या लोकप्रियतेचा विचार केल्यास महेंद्रसिंह धोनीने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना मागे काढले आहे, असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.