News Flash

पीटरसनला उद्देशून स्ट्रॉसचे आक्षेपार्ह उद्गार व माफी

मेरलिबोन क्रिकेट क्लबच्या द्विशतकी वर्षांनिमित्त आयोजित मैत्रीपूर्ण लढतीदरम्यानच्या वादग्रस्त समालोचनामुळे अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार असलेल्या स्ट्रॉसने माजी संघसहकारी केव्हिन पीटरसनला

| July 7, 2014 01:47 am

मेरलिबोन क्रिकेट क्लबच्या द्विशतकी वर्षांनिमित्त आयोजित मैत्रीपूर्ण लढतीदरम्यानच्या वादग्रस्त समालोचनामुळे अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार असलेल्या स्ट्रॉसने माजी संघसहकारी केव्हिन पीटरसनला उद्देशून आक्षेपार्ह उद्गार काढले.
दोन षटकांदरम्यान असणाऱ्या विश्रांतीच्या कालावधीत स्ट्रॉसने हे उद्गार काढले. इंग्लंडमध्ये वाहिनीवर जाहिराती असल्याने हे उद्गार प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाहीत, मात्र ऑस्ट्रेलियात जाहिरातविरहित प्रक्षेपण असल्याने स्ट्रॉसचे उद्गार जसेच्या तसे ऐकायला मिळाले.  हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्ट्रॉसने प्रक्षेपणादरम्यान तात्काळ माफी मागितली. पीटरसनच्या चुकीमुळे स्ट्रॉस आणि पीटरसन यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:47 am

Web Title: strauss caught out with rude comment about pietersen
Next Stories
1 नेयमारची दुखापत दुर्दैवी -सबेला
2 बेल्जियमविरुद्धचा सामना सर्वोत्तम -मेस्सी
3 डी मारियाच्या दुखापतीमुळे अर्जेटिनाला धक्का
Just Now!
X