३१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. सचिन तेंडुलकर भारतामध्ये क्रिकेटला धर्मात परावर्तित केले. सचिननं क्रिकेटमध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्याचे विक्रम आणि खेळाप्रती निष्टा पाहून चाहत्यांनी त्याला ‘क्रिकेटचा देव’ अशी पदवी बहाल केली. तीन दशकांपूर्वी १५ नोव्हेंबर १९८९ रोजी सचिन तेंडुलकरनं पाकिस्तानविरोधातील वयाच्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

१६ व्या सचिन तेंडुलकरनं वसीम आक्रम आणि इम्रान खान यांच्यासारख्या वेगवान माऱ्यांचा समर्थपणे सामना केला. भारताकडून सर्वात कमी वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर झाला. तेव्हापासूनच विक्रम आणि सचिनचं नातं झालं. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक विक्रम त्याच्या नावावर जमा होते.


सचिन तेंडुलकरला पदार्पणाच्या सामन्यात फक्त १५ धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या वकार युनूसनं सचिन तेंडुलकरला १५ धावांवर बाद केलं होतं. या कसोटी सामन्यात सचिनला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

२०० कसोटी सामने खेळणारा सचिन तेंडुलकर एकमेव खेळाडू आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यात ५१ शतकांच्या मदतीनं १५ हजार ९२१ धावा काढल्या आहेत. तर ४६३ एकदिवसीय सामन्यात ४९ शतकांच्या मदतीनं सचिनने १८ हजार ४२६ धावा काढल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर १०० शतकांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर ३४ हजारांपेक्षा जास्त धावा आहे. सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.