24 February 2021

News Flash

प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स यांच्या कारचा भीषण अपघात

लॉस एंजलिसमध्ये घडली घटना

टायगर वूडस् (Source: Reuters)

जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स एका भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. वूड्स यांच्या कारला मंगळवारी लॉस एंजलिसमध्ये अपघात झाला. यात टायगर वुड्स यांच्या पायाला इजा झाल्याचं वृत्त असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, अशी माहिती लॉस एंजलिस काउंटी शेरीफ विभागानं दिली आहे.

लॉस एंजलिसमधील रोलिंग हिल्स एस्टेट्स आणि रॅंचो पालोस वेरिड्सच्या दरम्यान सकाळी ७.१२ वाजता ही अपघाताची घटना घडली. ब्लॅकहॉर्स रोडवरून जात असताना टायगर वूड्स यांची भरधाव कार अनियंत्रित झाल्यानंतर दुभाजकावर आदळली आणि पलटली. कारमध्ये वूड्स एकटेच होते. या अपघातात कारचं प्रचंड नुकसान झालं असून, वूड्स यांनीही गंभीर दुखापत झाली आहे.

लॉस एंजलिस काउंटी शेरीफ विभागाच्या माहितीनुसार अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वूड्स यांना रुग्णावाहिकेच्या साहाय्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं वृत्त असून, उपचार सुरू असलेल्या स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर सर्जरी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. वूड्स यांच्या अपघातग्रस्त कारची दृश्येही समोर आली आहेत.

या दृश्यात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झालेला असून, एअरबॅगही दिसत आहेत. हेलिकॉप्टरमधून हे छायाचित्र घेण्यात आलेलं आहे. वूड्सच्या अपघातानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 8:12 am

Web Title: tiger woods taken to hospital after california car crash bmh 90
Next Stories
1 गुलाबी चेंडूचे वळण कुणाकडे?
2 श्रेयसच्या शतकामुळे मुंबईचे ‘धवल’ यश!
3 “आयुष्यातील सर्वात गोड गिफ्ट”, टी नटराजनने शेअर केला मुलीसोबतचा गोंडस फोटो
Just Now!
X