जगातील सर्वात मोठ्या खेळांच्या महाकुंभाची सुरवात शुक्रवारपासून होत आहे. यामध्ये भारतासाठी एक विशेष गोष्ट आहे. भारत आपल्या ऑलिम्पिकचा १००वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या व्यतिरिक्त या वेळी भारत आपल्या अ‍ॅथलीट्सकडून अधिकाधिक पदकांची अपेक्षा करत आहे. दरम्यान, यावेळी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयाची अ‍ॅथलीट सहाभागी होणार आहे. जाणून घेऊया तिच्या विषयी..

ज्या वयात मुलांना काही समज नसते अशा वयात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक खेळाडू तिच्या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. १२ वर्षाची हेंड जाजा सर्वात तरुण अ‍ॅथलीट आहे. जाजा ही सीरियातील १२ वर्षाची टेबल टेनिसपटू आहे. जाजाच्या वयोगटातील मुलं अजूनही दुनियादारी समजून घेत आहेत. पण जाजा ऐवढ्या कमी वयात आपल्या देशाचे नाव प्रकाशित करण्यात मग्न आहे.

जॉर्डनमध्ये आयोजित पश्चिम एशिया क्वालिफायर स्पर्धेत जाजाने आपल्यापेक्षा ३१ वर्षांनी मोठे असलेल्या लेबनॉनच्या ३४ वर्षीय मारियाना शहकियानचा पराभव केला होता. तेव्हा या तरुण सीरियन अ‍ॅथलीटचे नाव चर्चेत आले. त्यानंतर जगातील १५५ व्या क्रमांकाच्या जाजाला गेल्या वर्षी वयाच्या ११व्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले होते.