अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अव्वल मानांकित सानिया मिर्झा-मार्टिना हिंगिस जोडीने उपांत्य फेरीत फ्लॅव्हिआ पेनेट्टा आणि सारा इराणी जोडीवर ६-४, ६-१ असा विजय मिळवीत अंतिम फेरीत स्थान पटकावले.

दुसरीकडे मिश्र दुहेरीत भारताचा शिलेदार लिएण्डर पेसनेही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लिएण्डर पेस आणि हिंगिस जोडीने उपांत्य फेरीत रोहण बोपण्णा, युंग जान चान जोडीचा ६-२, ७-५ असा पराभव केला. अंतिम फेरीत पेस-हिंगिस जोडीसमोर अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सँड्स आणि सॅम क्वेर्रे या अमेरिकन जोडीचे आव्हान असणार आहे. ना