जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट याचा जलवा जून महिन्यात होणाऱ्या रोम गोल्डन गाला स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. ६ जून रोजी स्टेडियो ऑलिम्पिको येथे होणाऱ्या या शर्यतीत बोल्ट पुन्हा रोमवासीयांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. सहा सुवर्णपदकांना गवसणी घालणारा बोल्ट सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर १३ जून रोजी नॉर्वे येथे होणाऱ्या बिसलेट क्रीडा स्पर्धेत तो धावणार आहे. त्यानंतर ओस्रावा येथे होणाऱ्या गोल्डन स्पाइक स्पर्धेत तो ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सहभागी होईल. १० ते १८ ऑगस्ट दरम्यान मॉस्को येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद शर्यतींसाठी बोल्टचा हा सराव असणार आहे.