28 March 2020

News Flash

प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित गुजराथीची आघाडी कायम

विदित हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू आहे

(संग्रहित छायाचित्र)

भारताचा ग्रॅँडमास्टर विदित गुजराथीने प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर तीन गुणांसह आघाडी कायम ठेवली आहे. त्याने चौथ्या फेरीत स्वीडनच्या निल्स ग्रॅँडेलियूसविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. भारताचा अन्य ग्रॅँडमास्टर पेंटाल्या हरिकृष्णने अमेरिकेच्या सॅम शॅकलॅँडविरुद्ध बरोबरी स्वीकारली. तिसऱ्या फेरीत हरिकृष्णला पराभव पत्करावा लागला होता.

विदित हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू आहे. निल्सविरुद्ध त्याला विजयाची संधी होती. मात्र तरीदेखील विदितला ३५व्या चालीला बरोबरी मान्य करावी लागली. पाचव्या फेरीत विदितची लढत इराणच्या अलिरेझा फिरुझाशी होईल. हरिकृष्णसमोर रशियाच्या निकिता विटिगोवचे आव्हान असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 1:08 am

Web Title: vidit gujrathis lead prague masters chess tournament abn 97
Next Stories
1 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : मुंबई बंदर, बॅँक ऑफ बडोदा उपांत्य फेरीत
2 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचे संकेत
3 U-19 WC : …भारताला दाखवून द्यायचं होतं ! बीभत्स सेलिब्रेशन करणाऱ्या बांगलादेशी गोलंदाजाची कबुली
Just Now!
X