27 September 2020

News Flash

Vijay Hazare Trophy 2018-19 : सिक्कीमच्या संघाच्या नावावर झाला लाजिरवाणा विक्रम

सिक्कीमच्या संघाच्या नावावर या पराभवामुळे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

Vijay Hazare Trophy 2018-19 : विजय हजारे करंडक स्पर्धेत रविवारी बिहारच्या संघाने सिक्किमच्या संघाचा २९२ धावांनी दणदणीत पराभव केला. बिहारने प्रथम फलंदाजी करत ६ बाद ३३८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सिक्कीमचा संघ केवळ ४६ धावांत गारद झाला. केशव कुमार आणि अनुनय सिंग या दोघांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपल्यामुळे बिहारला इतका मोठा विजय मिळवता आला.

बिहारचे चाहते या विजयामुळे प्रचंड खुश झाले. पण सिक्कीमच्या संघाच्या नावावर या पराभवामुळे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. सिक्कीमची धावसंख्या ही लिस्ट अ प्रकारात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या ठरली. या यादीत सर्वात कमी धावसंख्या ही सौराष्ट्रची मुंबईविरुद्ध आहे. या सामन्यात सौराष्ट्रने केवळ ३४ धावांत सर्व गडी गमावले होते. तर राजस्थानच्या संघाला रेल्वे संघाने ३५ धावांत तंबूत पाठवले होते. त्यानंतर सिक्कीमची धावसंख्या या यादीत तिसरी ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 6:28 pm

Web Title: vijay hazare trophy 2018 19 sikkim posts 3rd lowest total in the list a history
Next Stories
1 आता या गोष्टीचेही फलक लावा; बुमराहने जयपूर पोलिसांना सुनावले
2 संघातून वगळण्याच्या कारणांबद्दल करुण नायरशी चर्चा झालेली आहे – एम. एस. के. प्रसाद
3 धोनी, विराटच्या ‘त्या’ शब्दांमुळेच मिळाले कसोटी संघात स्थान – मोहम्मद सिराज
Just Now!
X