India tour of australia 2020 : आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाबरोबर चार कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. पण पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी येणार आहे. विराट कोहलीनं माघार घेतल्यामुळे भारतीय संघाच्या मनोबल खचलेलं असू शकतं. पण दिग्गज भारतीय फिरकी गोलंदानं सांगितलं की, विराट कोहलीच्या अनुपस्थित कोणत्या तीन खेळाडूवर भारतीय संघाची मदार असेल.

विराट कोहली समोरुन संघाचं नेतृत्व करतो. भारतीय संघाला मैदानावर विराट कोहलीमुळे सकारात्मकता आणि उर्जा मिळते. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली पितृत्वाची रजा घेत मायदेशी परतणार आहे. अशा परस्थितीत भारतीय संघाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी पुजारा आणि के. एल राहुल यांच्यावर असणार आहे.

भारताचा फिरकी गोलंदाज भज्जी म्हणतो की, विराट कोहलीच्या अनुपस्थिती संघातील इतर खेळाडूंनी संधीप्रमाणं पाहवं. हरभजन सिंहने एका मुलाखतीत म्हटलं की, जसं की राहुलसारखा फलंदाज कसोटी संघात पुनरागमन करत आहे. कर्णधाराच्या अनुपस्थितीत याला एक संधी म्हणून पाहायला हवं. राहुल, पुजारा आणि रोहित शर्मा यांच्याकडे तशी संधी आहे. या तिंघानी या सुवर्णसंधीचं सोनं करायला हवं.

कसोटी संघात रोहित शर्मानं सलामीला जावं असेही भज्जीला वाटतं, तो म्हणाला की, “विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परत येणार आहे. पण के. एल. राहुलसारख्या फलंदाजांना स्वत:ला सिद्ध कऱण्याची संधी आहे. विराट कोहली एक दिग्गज खेळाडू असून जेव्हाही तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला धावा जमवल्या आहेत.”