आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असला, तरीही आपली बायको अनुष्काचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने खास वेळ काढून रोमँटीक डेटवर जाणं पसंत केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विराटने या डेटचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – विराट कोहलीच्या पाठीशी उभं राहणं ही माझी जबाबदारी – रोहित शर्मा

अनुष्काने आज वयाच्या ३१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. विराट आणि अनुष्का हे चार वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. यानंतर डिसेंबर महिन्यात २०१७ साली विराट-अनुष्का विवाहबंधनात अडकले.

विराट आणि अनुष्का वेळात वेळ काढून एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी शोधत असतात. आयपीएल आटोपल्यानंतर भारतीय खेळाडू विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होतील. विराटने शेअर केलेल्या या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch virat kohli celebrates anushka sharmas birthday with a romantic date
First published on: 01-05-2019 at 21:18 IST