इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मात्र या सामन्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख एहसान मणी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. २००७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही प्रकारे द्विपक्षीय सामने होत नाहीतेय. हे सामने सुरु व्हावे यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मध्यंतरी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. मात्र आता आम्ही भारतासमोर भीक मागणीर नाही असा पवित्रा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

“पाकिस्तानसोबत क्रिकेट मालिका खेळण्यासाठी आम्ही भारत किंवा कोणत्याही देशासमोर भीक मागणार नाही. आम्हाला भारतासोबत क्रिकेट मालिका सुरु करायची आहे, मात्र ती सन्मानपूर्वक पद्धतीने सुरु व्हायला हवी.” एहसान मणी लाहोरच्या गदाफी स्टेडीयमबाहेर पत्रकारांशी बोलत होते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेचा संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात येणार असल्याचंही मणी म्हणाले.

अवश्य वाचा – शास्त्री गुरुजींना BCCI कडून बक्षीस, प्रशिक्षकपदावर मुदतवाढ

याचसोबत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास सहमती दर्शवली असल्याचंही मणी यांनी स्पष्ट केलं. याव्यतिरीक्त अन्य देशांना पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याबद्दल तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, त्यात आम्हाला नक्की यश येईल, असा विश्वास मणी यांनी व्यक्त केला.

अवश्य वाचा – धोनीचे चाहते आहात?? हे हॉटेल तुम्हाला देतंय फुकटात जेवण