News Flash

महाराष्ट्राची रेल्वेवर मात

महाराष्ट्राने बलाढय़ रेल्वे संघावर सुपर ओव्हरद्वारा मात करीत महिलांच्या राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी ट्वेन्टी२० स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला.

| January 15, 2015 03:40 am

महाराष्ट्राने बलाढय़ रेल्वे संघावर सुपर ओव्हरद्वारा मात करीत महिलांच्या राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी ट्वेन्टी२० स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला. स्पर्धेतील अन्य लढतीत ओडिशाने गुजरातवर सहा गडी राखून मात केली.
 प्रथम फलंदाजी करताना रेल्वे संघाने २० षटकांत ६ बाद ११३ धावा केल्या. त्यामध्ये हरमानप्रीत कौर हिने सर्वाधिक ३६ धावा टोलविल्या. विजयासाठी ११४ धावांचे आव्हानास सामोरे जाताना महाराष्ट्राने ५ बाद ११३ धावा केल्या. दोन्ही संघांच्या समान धावा झाल्या मात्र महाराष्ट्राने एक विकेट कमी गमावल्यामुळे महाराष्ट्रास विजयी घोषित करण्यात आले. महाराष्ट्राकडून कर्णधार स्मृती मंधाना (३७) व श्वेता माने (नाबाद ३०) या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
अन्य लढतीत ओडिशाने गुजरातवर विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 3:40 am

Web Title: womens t20 cricket maharashtra vs railway
Next Stories
1 बीसीसीआयच्या नाराजीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
2 प्रशिक्षक निवडीत कोहलीचा सहभाग हवा -डीन जोन्स
3 ऑस्ट्रेलियाच्या संघात भारतीय वंशाचा खेळाडू
Just Now!
X