News Flash

Cricket World Cup 2019 : फायनलपेक्षा भारत-पाक सामन्याचं तिकिट महाग

जी तिकिटं १७,१५० रुपये व ८,३३५ रुपयांना उपलब्ध होती त्यांचे दर तब्बल १.५ लाख रुपये व १.३१ लाख रुपये इतके फुगलेत

(संग्रहित छायाचित्र)

इंग्लंडमधल्या वर्ल्ड कपमध्ये भारत खेळत असलेल्या सामन्यांच्या तिकिटांचे भाव गगनाला भिडत आहेत. इंग्लंडबरोबर एजबस्टन येथे जून ३० रोजी होणाऱ्या सामन्याचे तिकिट आयसीसी व त्यांची तिकिटविक्रीतील भागिदार कंपनी तिकिट मास्टर आधी २०,६६८ रुपयांना विकत होती. आता मात्र याच प्लॅटिनम तिकिटाचा भाव ट्रॅवल एजंटच्या माध्यमातून तब्बल ८७,५१० रुपये इतका वधारला आहे.

तर लॉर्ड्सवर १४ जुलै रोजी खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड कपच्या फायनलच्या तिकिटांचे दर तर त्याहूनही वेगाने अस्मानाला भिडत आहेत. सिल्वर व ब्राँझ श्रेणीतील लॉर्डसची तिकिटं आधी अनुक्रमे १७,१५० रुपये व ८,३३५ रुपयांना उपलब्ध होती. आता याच तिकिटांचे दर तब्बल १.५ लाख रुपये व १.३१ लाख रुपये इतके फुगले आहेत. आयसीसीच्या मूळ नोंदींनुसार भारत फायनलमध्ये गेला तरी तिकिटाचा दर ३४,७४० रुपये आहे. विशेष म्हणजे हे ब्लॅकचे दर नसून आयसीसीचे अधिकृत ट्रॅवेल एजंट असलेल्या फॅनाटिक स्पोर्टस या कोलकातास्थित कंपनीचे हे दर आहेत.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार जेव्हा त्यांनी फॅनाटिक स्पोर्टसशी संपर्क साधला त्यावेळी कंपनीनं उपलब्ध असलेली तिकिटं व त्यांचे दर यांचा सविस्तर ईमेल पाठवला. विशेष म्हणजे आयसीसीच्या आदेशाप्रमाणे सर्व काही होईल असंही यात नमूद करण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ही तिकिटं क्रिकेट फॅननाच प्रवास व राहण्यासोबत पॅकेज म्हणून देण्यात येणं अपेक्षित आहे.

भारत पाकिस्तानमध्ये रंगणाऱ्या मँचेस्टर येथील सामन्यासाठी फॅनाटिकनं १.६६ लाख रूपयांचं प्लॅटिनम कम गाला तिकिट ऑफर केलं असून यात मँचेस्टर सिटी सुइटमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे या ट्रॅवल एजंटच्या माध्यमातून उपलब्ध असेलल्या तिकिटांच्या दरांचा विचार केला तर फायनलपेक्षा भारत – पात सामन्याचं तिकिट महाग असल्याचं दिसत आहे. इंग्लंडमधल्या सामन्यांमध्ये असलेल्या घोळांमुळे याआधीही आयसीसीवर ताशेरे ओढण्यात आले होते. पाकिस्तान वेस्टइंडिज यांच्यातील सामन्यांची तिकिटं ऑनलाइन बुक करूनही प्रेक्षकांना मिळालीच नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 12:09 pm

Web Title: world cup rs 17000 ticket being sold at rs 1 5 lakh
Next Stories
1 Cricket World Cup : ‘त्या’ फोनमुळे सचिनने रद्द केला निवृत्तीचा निर्णय
2 तेच मैदान, तोच संघ.. पाचशेचे शिखर?
3 ऑस्ट्रेलियाचा शत्रू, तो आमचा मित्र!
Just Now!
X