News Flash

‘तुझं वजन वाढलंय’ म्हणत मॅथ्यू वेडनं ऋषभ पंतची उडवली खिल्ली; व्हिडीओ व्हायरल

दोघांमध्ये शाब्दिक चकमक

ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज मॅथ्यू वेड आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील शाब्दिक चकमक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. मॅथ्यू वेडनं वाढत्या वजनावरुन ऋषण पंतची खिल्ली उडवली. पंतनेही वेडला जशास तसं प्रत्त्युतर दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आपल्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत होता. भारतीय गोलंदाजापुढे कांगारुंनी गुडघे टेकले होते. पण मॅथ्यू वेड एका बाजूनं संयमी फलंदाजी करत होता. त्याला बाद करण्यासठी भारतीय गोलंदाज जिवाचं राण करत होतं. मात्र, त्याचा संयम तुटत नव्हता. पंतनं यष्टीमागून वेडचा संयम तोडण्याचा सल्ला केला. मात्र, मॅथ्यू वेडनं पंतला त्याच्या जाडेपणावरुन डिवचलं.’ तू स्वत:ला कधी मोठ्या स्क्रीनवर पाहिलेस का ? ३० ते ४० किलो वजन वाढल्याचं दिसतेय.’ असा टोमणा वेडनं पंतला मारला होता. पंतनेही मॅथ्यू वेडला आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.


— Andrew McCormack (@_AMcCormack7) December 28, 2020


सामन्यादरम्यान दोघांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक झाली. या प्रसंगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दुसऱ्या डावात मॅथ्यू वेड ४० धावांवर बाद झाला.

पहिल्या डावातही मॅथ्यू वेडला बाद करण्यात ऋषभ पंतला बाद करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

मॅथ्यू वेडनं चौकार मारल्यानंतर ऋषभ पंतने अश्विनला सल्ला दिला. त्यानंतर लगेच मॅथ्यू वेड बाद झाला होता. २०१८ दौऱ्यात पंत आणि पेन यांच्यादरम्यान बेबीसिटरवरुन झालेलं स्लेजिंग आजही सर्वांच्या आठवणीत असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 1:45 pm

Web Title: youre 25 kilos overweight matthew wade to rishabh pant nck 90
Next Stories
1 ‘त्या’ प्रसंगावर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया, म्हणाला….
2 Ind vs Aus : मेलबर्न कसोटीवर भारताचं वर्चस्व, ऑस्ट्रेलिया नाममात्र आघाडी घेण्यात यशस्वी
3 तुमचा तो बाब्या, आमचं ते…; पेन आणि रहाणेसाठी वेगळा नियम, तिसऱ्या पंचांविरोधात चाहत्यांमध्ये नाराजी