News Flash

युवी कोहलीच्या पाठिशी, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना ही कौतुकाची गोष्ट

संपूर्ण संघ कर्णधार विराट कोहलीच्या पाठिशी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर खोचक टीका करत ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी त्याची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या केली. त्यानंतर कोहलीच्या समर्थनार्थ संपूर्ण भारतीय क्रिकेटने ऑस्ट्रेलियातील माध्यमांविरोधात आवाज उठवला आहे. त्यात आता कोहलीचा संघ सहकारी आणि खूप चांगला मित्र असलेला युवराज सिंग यानेही ऑस्ट्रेलियन माध्यमांवर तोंडसुख घेतले. ”ऑस्ट्रेलियन मीडियाकडून विराटची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणं ही कौतुकाची गोष्ट आहे. यातून ऑस्ट्रेलियाने कोहली सर्वोत्तम असल्याचे मान्य केले आहे”, असे युवी म्हणाला.

 

याआधी चेतेश्वर पुजारानेही कोहलीच्या पाठिशी पूर्ण संघ उभा असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी केलेली टीका दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. संपूर्ण संघ कर्णधार विराट कोहलीच्या पाठिशी असून तो एक जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे, असे पुजारा म्हणाला होता. ऑस्ट्रेलियन माध्यमांमुळे या कसोटीला वेगळेच वळण मिळाले आहे, ते अत्यंत लज्जास्पद आहे. तरीसुद्धा संघातील प्रत्येक खेळाडूचे लक्ष चौथ्या कसोटीकडे आहे. मैदानाबाहेर घडणाऱया अशा गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या वाटत नाहीत, असेही पुजारा म्हणाला होता. याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यानेही कोहलीची बाजू मांडली होती. ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीत मायकेल क्लार्क याने विराट कोहलीची प्रतिम मलिन करण्याचा ऑस्ट्रेलियातील दोन-तीन पत्रकारांचा डाव असल्याचा आरोप केला होता. विराटने अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये, असेही क्लार्क म्हणाला होता.

रांची कसोटीत पराभवाची टांगती तलवार डोक्यावर असताना ऑस्ट्रेलियन संघाने झुंजार खेळ करत कसोटी अनिर्णित राखली. या झुंजार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी संघाचे कौतुक करताना विराट कोहलीला उद्देशून विखारी टीका केली होती. ‘कोहली म्हणजे जागतिक क्रीडा क्षेत्रातील डोनाल्ड ट्रम्प आहेत,’ अशी बोचरी टीका ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी केली आहे. तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ओळखले जातात. कोहलीची तुलना ट्रम्प यांच्याशी केल्याने कोहली वि. ऑस्ट्रेलिया या वादाची राळ नव्याने उडाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2017 2:22 pm

Web Title: yuvraj singh on kohli trump comparison its a big compliment for virat
Next Stories
1 ‘बीसीसीआय’ने कोहलीला एकटं पाडलं- अनुराग ठाकूर
2 मुख्यमंत्र्यांच्या शहरात उपेक्षित! (नागपूर)
3 कोहलीबाबत प्रश्नचिन्ह
Just Now!
X