15 runs in 1 ball Oshane Thomas achieves bizarre record in BPL : क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच काही ना काही चकित करणारे घडते. एक गोलंदाज एका चेंडूवर किती धावा करू शकतो असे जर तुम्हाला विचारले तर तुमचे उत्तर बहुधा सहा धावा असे असेल. तुमचं उत्तर काही वेगळं असण्याची शक्यता आहे, पण १५ धावा होणार नाहीत हे मात्र नक्की. पण २०२४ वर्ष संपण्यापूर्वी क्रिकेटमध्ये एक आश्चर्यकारक गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, ज्यामध्ये गोलंदाजने एका चेंडूवर १५ रन्स दिल्या आहे. ही घटना बांगलादेश प्रीमियर लीग २०२४ च्या तिसऱ्या सामन्यात घडली आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बांगलादेश प्रीमियर लीग २०२४ मधील तिसरा सामना जो खुलना टायगर्स विरुद्ध चटगाव किंग्ज यांच्यात खेळला जात होता. या सामन्यात खुलना टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २०३ धावा केल्या होत्या. म्हणजेच आता चितगाव किंग्जला विजयासाठी २०४ धावा करायच्या होत्या. यानंतर चितगाव किंग्जचा संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा ओशाने थॉमस पहिले षटत टाकण्यासाठी आला. जो वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.

ओशाने थॉमसने एका चेंडूत दिल्या १५ धावा –

त्याने टाकलेला पहिला चेंडू नो बॉल होता. यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही, जो फ्री हिट होता. यानंतर, जेव्हा त्याने दुसरा चेंडू टाकला तेव्हा तो षटकार गेला, पण तो नो बॉल होता. यानंतर पुन्हा फ्री हिटची संधी चालून आली, मात्र थॉमसने हा फ्री हिट चेंडू दोनदा वाईड फेकून दिला. यानंतर फ्री हिटमध्ये चौकार मारण्यात आला, पण तोही नो बॉल घोषित करण्यात आला. आतापर्यंत थॉमसने दोन चेंडूही पूर्ण केले नव्हते आणि धावफलकावर १५ धावा झाल्या होत्या. या चौकारानंतर फ्री हिट चेंडूवर एकही रन झाली नाही आणि हा चेंडू फेअर डिलीव्हरीवरी होता.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माच्या इन्स्टा पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष, ‘Thank You’ वाल्या VIDEO वर चाहते भावुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओशाने थॉमसच्या षटकाचा मजेशीर व्हिडीओ –

नो बॉलची कहाणी इथेच थांबली नाही, तर दुसरा चेंडू हा फेअर डिलीव्हरीवरी होता. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. पण चौथ्या चेंडूही ओशान थॉमसने नो बॉल टाकला. त्यानंतर फ्री हिट चेंडूवर फेअर डिलीव्हरीवरून २ धावा झाल्या. पाचव्या चेंडूवर थॉमसने नईम इस्लामला बोसिस्टोच्या हाती झेलबाद केले. या षटकात ओशान थॉमसने ६ वैध चेंडू टाकण्यासाठी एकूण १२ चेंडू टाकले आणि या षटकात एकूण १८ धावा खर्च केल्या. त्याचबरोबर या षटकात एक विकेटही मिळाली. हे षटक अतिशय मनोरंजक होते. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून सध्या सर्वत्र त्याची चर्चा होत आहे.

ओशाने थॉमसचे पहिले षटक: नो बॉल-०-नो बॉल६-वाईड-वाईड-नो बॉल्स४-०-०-नो बॉल्स-२-आउट-०