मागील वर्ष हे भारतीय क्रीडापटूंसाठी चढ-उतारांचे होते. काहींनी अविश्वसनीय कामगिरी करताना तमाम क्रीडाप्रेमींना जल्लोषाची संधी दिली, तर काहींनी अपेक्षाभंग केला. पण मावळते वर्ष हे भारतीयांसाठी आश्वासक ठरले. महिला खेळाडूंनी क्रीडाक्षेत्रातील आपले महत्त्व अधोरेखित केले, तर युवा खेळाडूंनीही विविध स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आशादायी चित्र निर्माण केले आहे. त्यामुळेच २०१७मध्ये या युवा खेळाडूंकडूनच अपेक्षा वाढल्या आहेत. क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी, बुद्धिबळ, तिरंदाजी या खेळांपलीकडे भारताने झेप घेत विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे आव्हान खांद्यावर घेतले आहे.

ऑक्टोबर महिन्यात भारतात होणारी १७ वर्षांखालील वयोगटाची स्पर्धा ही देशातील क्रीडाक्षेत्राला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

तसेच पुढील वर्षी अहमदाबाद येथे जागतिक युवा (१६ वर्षांखालील) बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पध्रेचे आयोजन होणार आहे, परंतु त्याच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्याचबरोबर आशियाई कुस्ती आणि जागतिक वरिष्ठ बॅडमिंटन स्पध्रेचे यजमानपदही भारताने मिळवले असल्याने चाहत्यांना दर्जेदार खेळाचा आस्वाद लुटता येणार आहे.

all-sport1

all-sport2

all-sport3