scorecardresearch

Premium

Team India : रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहसह ‘या’ पाच भारतीय खेळाडूंचा आज वाढदिवस

Today five Indian cricketers birthday : टीम इंडियासाठी ६ डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. कारण आज पाच भारतीय खेळाडूला आपला वाढदिवस साजरा करत आहे. यापैकी तीन खेळाडू टीम इंडियासह दक्षिण आफ्रिका दोऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

Five Indian cricketers are celebrating their birthdays today
रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहचा वाढदिवस (फोटो-बीसीसीआय एक्स)

Five Indian cricketers are celebrating their birthdays today : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. या दोऱ्याता भारतीय संघ टी-२०, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघासाठी ६ डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. कारण आजच्या दिवशी पाच भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस आहे. यापैकी तीन खेळाडूचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात समावेश आहे. यामध्ये रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर करुण नायर आणि माजी क्रिकेटपटू आरपी सिंग यांचाही वाढदिवस आहे.

१. रवींद्र जडेजा

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. रवींद्र जडेजा हा गोलंदाजी आणि फलंदाजीबरोबर उत्तम क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. जडेजाने टीम इंडियासाठी अनेक वेळा एकट्याने सामने जिंकून दिले आहेत. रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाच्या नावावर ६ हजारांहून अधिक धावा आणि ५४६ हून अधिक विकेट्स आहेत.

२. जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. बुमराह आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. २०२३ च्या विश्वचषकात बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. दुखापतीतून सावरल्यानंतर बुमराहने प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात शानदार पुनरागमन केले. या विश्वचषकात बुमराहची कामगिरी वाखाणण्याजोगी होती.

हेही वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून दीपक चहर माघार घेणार? जाणून घ्या काय आहे कारण

३. श्रेयस अय्यर

टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज श्रेयस अय्यर आज त्याचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. अय्यर फलंदाजीत जितका उत्कृष्ट आहे, तितकाच त्याचे क्षेत्ररक्षणही अप्रतिम आहे. विश्वचषकात अय्यरची कामगिरीही चांगली होती. आता श्रेयस अय्यरही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.

४. करुण नायर

टीम इंडियाचा स्टार फलंदाज करुण नायरही आज त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावण्याचा विक्रमही करुण नायरच्या नावावर आहे. मात्र, करुण नायरला संघात अनेक सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने टीम इंडियासाठी ६ कसोटी आणि २ वनडे सामने खेळले आहेत.

हेही वाचा – चांगल्या कामगिरीचे भारताचे लक्ष्य! इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध  पहिला ट्वेन्टी-२० सामना आज;मंधाना, कौरकडून अपेक्षा

५. आरपी सिंग

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग देखील आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. आरपी सिंग २००७ च्या टी-२० वर्ल्ड विजेत्या टीम इंडियाचा भाग होता. या संपूर्ण स्पर्धेत त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. आरपी सिंगने टीम इंडियासाठी भरपूर क्रिकेट खेळले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5 indian cricketers celebrating their birthdays today are ravindra jadeja jasprit bumrah shreyas iyer rp singh karun nair vbm

First published on: 06-12-2023 at 11:56 IST

संबंधित बातम्या

×