World Cup 2023, Angelo Mathews Timed Out in Bangladesh vs Srilanka: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३८ वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात दिल्लीत खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज ज्या पद्धतीने पॅव्हेलियनमध्ये परतला त्यावरून वादाला तोंड फुटले आहे. मैदानावरील पंचांनी टाईम आऊट दिल्यानंतर श्रीलंकेचा खेळाडू खूप संतापलेला दिसत होता. दरम्यान, तो रागाच्या भरात सीमारेषेजवळ हेल्मेट फेकताना दिसला. एवढेच नाही तर मैदानातून परतताना तो पंच आणि विरोधी संघाकडे रागाने बघताना दिसला. त्यामुळे सामनाधिकारी त्याच्यावर कारवाई करू शकतात.

२५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर ही घटना घडली. यानंतर शाकिब अल हसनने मैदानात आलेल्या फलंदाज अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध ‘टाईम आऊट’ची अपील केली. वास्तविक, मॅथ्यूजने सुरुवातीला खराव हेल्मेट आणले होते, त्यानंतर त्याने हेल्मेट बदलण्यास सांगितले. यावर शाकिबने अपील केली. मैदानावरील पंच माराईस इरास्मस यांनी शाकिबला वारंवार विचारले, तू खरोखरच अपील करत आहेस का? बांगलादेशचा कर्णधार म्हणाला, होय आम्ही अपील करत आहोत. यानंतर इरास्मसने मॅथ्यूजला बाद घोषित करण्यात आले.

शाकिबने दाखवली नाही खेळ भावना –

सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूज विरोधी संघाचा कर्णधार शाकिब अल हसनशी बोलताना दिसला, पण शाकिबने अपील मागे न घेता अजिबात दया दाखवली नाही. त्यानंतर मैदानावरील पंचांशी बोलूण घेण्सास सांगितले. यानंतर अँजेलो मॅथ्यूज पंचांशीही चर्चा केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्याला तंबूत परतावे लागले.

काय आहे टाइम आऊटचा नियम?

एमसीसीच्या नियमावलीनुसार, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाहेर गेल्यानंतर पुढच्या तीन मिनिटांत पुढच्या फलंदाजाने मैदानात थेट क्रीजवर येऊन फलंदाजी करण्यासाठी तयार राहायला हवं. जर यादरम्यान अतिरिक्त वेळेची मागणी पंचांच्या परवानगीने किंवा संमतीने करण्यात आली असेल, तर ते विचारात घेतलं जातं. मात्र, तसं नसल्यास तीन मिनिटांच्या आत फलंदाज सर्व तयारी करून चेंडू खेळण्यासाठी क्रीझवर उपस्थित असायला हवा.

हेही वाचा – SL vs BAN: १४६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, अँजेलो मॅथ्यूज ठरला ‘टाइम आऊट’चा बळी, पाहा संपूर्ण घटनेचा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॅथ्यूजच्या बाबतीत इथेच गोंधळ झाला. मॅथ्यूज मैदानावर आला खरा. क्रीझवरही उभा राहिला. पण नेमकं तेव्हाच त्याला त्याच्या हेलमेटची पट्टी निसटल्याचं लक्षात आलं. त्यावर त्यानं डगआऊटमधून दुसरं हेल्मेट मागवलं. तोपर्यंत बराच वेळ गेला. यादरम्यान शाकिब अल हसननं टाईम आऊटची अपील केली. मैदानावरील दोन्ही पंचांनी नियमाचा आढावा घेतला आणि मॅथ्यूजला बाद घोषित करण्यात आले.