scorecardresearch

SA20: जॉन्टी ऱ्होड्सच्या ‘त्या’ कृत्तीने जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO होतोय व्हायरल

Jonty Rhodes Video: ५.२ षटकांदरम्यान मुसळधार पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी तेव्हा, दोन ग्राउंड्समन खेळपट्टी ओले होऊ नये म्हणून मैदानावरील कव्हर्स ओढत होते, परंतु मुसळधार पावसामुळे त्यांना तसे करता आले नाही. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी जॉन्टी ऱ्होड्स धावला.

Jonty Rhodes Video Viral
जॉन्टी ऱ्होड्स (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

सध्या दक्षिण आफ्रिकेत टी-२० लीग (SA20) सुरू आहे. शुक्रवारी स्पर्धेच्या २५ व्या सामन्यात डर्बन सुपर जायंट्सचा सामना सनरायझर्स इस्टर्न केपशी झाला. सामना सुरू होण्यास काही वेळातच पाऊस सुरू झाला. पाऊस इतक्या वेगाने येत होता की ग्राउंड्समनला खेळपट्टी कव्हर करण्यासाठी धावाधाव करावी लागली. ग्राउंड्समनची तारांबळ पाहून, डर्बन सुपर जायंट्सचे प्रशिक्षक जॉन्टी रोड्स मदतीला धावला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जॉन्टी रोड्सने ग्राउंड स्टाफला पूर्ण ताकदीने आणि चपळाईने खेळपट्टी झाकण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. त्याच्याबरोबर इतर काही खेळाडू देखील मदत करण्यासाठी पुढे आलेले दिसले. ज्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी जॉन्टीच्या या कामाचे कौतुक केले. यासंबंधीचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जॉन्टी रोड्स आपल्या या छोट्या कृतीने चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

डर्बनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होती. पाऊस सुरू होण्यापूर्वी सामन्यातील केवळ ५.२ षटके टाकण्यात आली होती. त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ग्राउंड स्टाफची तारांबळ उडाली होती. त्यामुळे जॉन्टी ताबडतोब कव्हर घेऊन मैदानावर पोहोचला. वेगाने पडणाऱ्या पावसामुळे प्रयत्न असूनही त्यांना खेळपट्टी झाकण्यात अडचण येत होती.

जॉन्टी ऱ्होड्सचा मदत करतानाचा व्हिडिओ

डर्बन सुपर जायंट्सचे जॉन्टी ऱ्होड्स आणि मोर्ने मार्केलसह खेळपट्टीवर कव्हर झाकताना दिसत आहेत. त्याचबरोबर ग्राउंड स्टाफला मदत करताना व्हिडिओमध्ये खेळपट्टी झाकण्यासाठी मदत केली. व्हिडिओमध्ये जॉन्टी आणि मोर्ने मार्केलसह त्यांचे इतर साथीदार देखील कव्हर्स ओढण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

हेही वाचा – ‘… अखेर विराट कोहलीला भेटलो भाई’; स्टार क्रिकेटरला भेटल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

डर्बन आणि सनरायझर्स यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सामना थांबण्यापूर्वी डरबनने ५.२ षटकांत ५३ धावांत सनरायझर्सचे ३ विकेट्स पडल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या टेम्बा बावुमा आणि जॉर्डन हरमन यांना रीस टोपलीने झटका देत सनरायझर्सला गोल्डन डकवर बाद केले.कर्णधार अॅडम मार्करामही ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांचे १-१ गुण झाले. लीगच्या पॉइंट टेबलमध्ये सनरायझर्स इस्टर्न केप दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर डर्बन सुपर जायंट्स पाचव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 14:53 IST
ताज्या बातम्या