वसीम अक्रमचे आत्मचरित्र ‘सुलतान: अ मेमोयर’ हे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. जे अनुभवी वेगवान गोलंदाजाच्या खेळण्याच्या दिवसांमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाविषयी वादग्रस्त विधानांनी भरलेले आहे. याआधीच्या वृत्तांतून समोर आले होते की, पुस्तकात अक्रमने माजी कर्णधार सलीम मलिकवर टीका करताना म्हटले: “तो नकारात्मक, स्वार्थी होता आणि माझ्याशी एका नोकराप्रमाणे वागला. त्याने मला मसाज करण्याची मागणी केली, त्याने मला माझे कपडे आणि बूट स्वच्छ करण्याचे आदेश दिले.”असा आरोप त्या पुस्तकात अक्रमने केला होता. आता वसीम अक्रमने पाकिस्तानचा आणखी एक माजी कर्णधार राशिद लतीफवर टीका केली आहे.

“पाकिस्तान संघात पीसीबीचे अनेक लॉबिस्ट कामावर होते.” असा आरोप त्याने त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. जुलै २००० मध्ये, राशिद लतीफने द संडे टेलिग्राफला एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्याने दावा केला की १९९६ च्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला ३०० पेक्षा कमी धावा करण्यासाठी १५,००० पौंड ऑफर करण्यात आली होती. कोणास ठाऊक? आणि कदाचित त्याने तसे केले असेल, पण त्या वेळी त्याने मला, त्याच्या कर्णधाराला सांगितले का? नाही. त्याने त्याच्या प्रशिक्षकाला किंवा व्यवस्थापकाला सांगितले होते का? नाही. त्याने कय्युमला सांगितले होते का? नाही. क्रिकेट पाकिस्तान अक्रमच्या आत्मचरित्रातील एक परिच्छेदात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

अक्रमने माजी सहकारी आमिर सोहेलला पुस्तकात ‘झॉम्बी फिगर’ म्हटले आहे. “टोरंटोमधील डीएमसी ट्रॉफीसाठी मला सार्वजनिकरित्या कर्णधारपद बहाल करण्यात आले. बदलाचा आवाज नवीन प्रशिक्षक वसीम राजा आणि नवीन निवडकर्त्यांचा मी समाधानी आहे: वसीमचा भाऊ रमीज, नौशाद अली आणि अब्दुर रकीब त्यांच्या अथक लॉबिंगनंतर मला परत त्यावरून हटवण्यात आले. त्यावेळीची आठवण सांगताना त्याने पुस्तकात उल्लेख केला आहे. माजी डावखुरा गोलंदाज आमिर सोहेलची ‘झॉम्बी’ फिगर असे वर्णन करत त्याच्यावर ही त्याने निशाना साधला आहे.

हेही वाचा:  IND vs PAK: पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का, वर्ल्ड कपसाठी भारताने व्हिसा देण्यास दिला नकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसीमचे पुढे आत्मचरित्र वाचताना त्याचा दीर्घकाळचा वेगवान गोलंदाज वकार युनूसलाही सोडले नाही. “वकार, तोपर्यंत (२००३) आमचा सर्वोत्तम इलेव्हनमध्ये तो नव्हता . तौकीरमुळे त्याला कर्णधार बनवण्यात आले आणि त्याकाळात संघात तौकीरचा उपद्रव अधिक वाढत गेला होता. उदाहरणार्थ, शोएबने थेट तौकीरशी संपर्क साधण्याची विनंती करून त्याला सामील करून घेतले. त्याच्या स्वत: च्या डॉक्टर तौसीफ रझाक यांनी त्यासाठी पीसीबीकडे त्याच्यासाठी शब्द टाकला होता.,” असेही पुढे त्या परिच्छेदात म्हटले आहे.