Mithali Raj reveals about her personal life and dating life : भारतीय महिला क्रिकेटला पुढे नेण्यात मिताली राजचं खूप महत्त्वाचं योगदान आहे, जे कधीही विसरता येणार नाही. ती महिला क्रिकेट संघाची कर्णधारही राहिली आहे. मितालीला पाहून देशातील अनेक मुलींनी क्रिकेटचा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. मिताली राजने आपल्या कारकिर्दीत खूप धावा आणि विक्रम केले. मात्र, क्रिकेट जगतात अनेक यश संपादन केलेल्या मिताली राजच्या आयुष्यात एकही पुरुष नाही आणि ती अजूनही अविवाहित आहे. आता तिने एका पॉडकास्टमध्ये आपलं लग्न आणि डेटिंग लाईफ अशा अनेक प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली.

मिताली राजने तिच्या डेटिंग लाईफबद्दल काय सांगितलं?

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू मिताली राज नुकतीच एका पॉडकास्टचा भाग बनली, जिथे तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. मितालीने प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरं दिली. जेव्हा तिला तिच्या डेटिंग लाईफबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने सांगितलं की, ‘मी रिलेशनशिपमध्ये होती, मी एका मुलाला डेट देखील केलं आहे. मी त्याला एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले होते. यानंतर आम्ही एकमेकांचे नंबर घेतले, पण मी त्याला सरळ सांगितले होतं की, या नात्यात कसलीही बांधिलकी नाही, माझी बांधिलकी खेळाशी आहे.’ जेव्हा मिताली राजला विचारण्यात आले की, ती त्या व्यक्तीला कशी भेटली, तेव्हा तिने सांगितलं की, ‘मी त्याला ट्रेनिंग दरम्यान भेटली होती.’

लग्नानंतर क्रिकेट सोडावं लागेल –

जेव्हा तिला काही अरेंज मॅरेजच्या मीटिंगबद्दल विचारलं, तेव्हा मिताली राज म्हणाली की, ‘अरेंज मॅरेजच्या कोणत्याही मीटिंग झाल्या नाहीत. काही लोकांशी फोनवर नक्कीच बोलणं झालं होतं.’ तिने महिला क्रिकेट संघाची कर्णधार असतानाचा एक किस्सा सांगितला. तिने सांगितलं की, ‘मला एका व्यक्तीचा फोन आला, अगोदर लग्नासाठीचं नॉर्मल बोलणं झालं. मग त्याने मला विचारलं की लग्नानंतर किती मुलांना जन्म देशील आणि लग्नानंतर मला क्रिकेट सोडावं लागेल. कारण मुलांची आणि कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर असेल.’ मिताली राज पुढे म्हणाली, ‘मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले की ज्याच्यासाठी माझ्या आई-वडिलांनी एवढा त्याग केला, मी एवढा त्याग केला, मी माझे क्रिकेट असचं सोडून देऊ.’

हेही वाचा – Mohammad Amaan : कर्णधार मोहम्मद अमानच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, जपानसमोर ठेवले ३४० धावांचे लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिताली राजची क्रिकेट कारकीर्द –

मिताली राज सध्या ४२ वर्षांची आहे. तिने भारतासाठी जवळपास २३ वर्षे क्रिकेट खेळले आहे. मितालीने १९९९ मध्ये भारतीय संघासाठी पहिला सामना खेळला होता. हा प्रवास २०२२ मध्ये संपला. मितालीने भारतासाठी २३२ एकदिवसीय, १२ कसोटी आणि ८९ टी-२० सामने खेळले आहेत. मितालीने सर्व फॉरमॅटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.