भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स एकमेकांचे किती खास मित्र आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून आयपीएल खेळत असताना दोघांमध्ये झालेली घट्ट मैत्री आजही टिकून आहे. मात्र, डिव्हिलियर्स आपल्या या मित्राच्या मेसेजला वेळच्यावेळी रिप्लाय देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. डिव्हिलियर्सने केलेल्या एका ट्वीटमुळेच ही बाब उघड झाली आहे.

विराट कोहलीने दोन वर्षांपूर्वी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये विराटसोबत एबी डिव्हिलियर्स, मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल दिसत आहेत. विराट कोहलीने या फोटोला एक मजेशीर कॅप्शन दिले होते. “या फोटोमुळे मला पुन्हा शाळेतील दिवसांची आठवण झाली आहे. एकाच वर्गातील चार मुलांपैकी फक्त एबी असा मुलगा आहे ज्याने गृहपाठ पूर्ण केला आहे. इतर तीन जणांना माहित आहे की ते आता अडचणीत आले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहलीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये फक्त डिव्हिलियर्सच्या चेहऱ्यावर हसू आहे. तर, विराटसह बाकीचे खेळाडू काहीसे उदास दिसत आहेत. या फोटोवर आता दोन वर्षांनी एबी डिव्हिलियर्सने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. विराटच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एबी डिव्हिलियर्सने लिहिले की, “आणि मी सिराजचा गृहपाठ केला आहे.” ही प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहे.