Asia Cup 2025 Abhishek Sharma Creates History: आशिया चषक २०२५ मध्ये भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा वादळी फॉर्मात आहे. सलग तीन सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला चांगली सुरूवात करून देण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. त्याने शेवटच्या सुपर फोर सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यादरम्यान त्याने इतिहास घडवत दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे.
अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान आणि माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीला एकाच वेळी मागे टाकलं आहे आणि या महत्त्वाच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात ३४ धावा केल्या आणि टी२० आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात मोठा विक्रम रचला.
अभिषेक शर्माने श्रीलंकेविरूद्ध सामन्यात अभिषेक शर्माने ३१ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. पण या खेळीत ३४ धावा पूर्ण करताच अभिषेक हा आशिया चषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि माजी भारतीय कर्णधार विराट कोहली यासारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.
अभिषेकने या स्पर्धेत आतापर्यंत २८२ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, जे टी२० आशिया चषकाच्या एकाच हंगामात कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी, हा विक्रम मोहम्मद रिझवानच्या नावावर होता, ज्यांनी २०२२ च्या टी-२० आशिया चषकामध्ये २८१ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने त्याच वर्षी २७६ धावा करून उल्लेखनीय पुनरागमन केलं होतं, परंतु अभिषेकने आता या दोघांनाही मागे टाकत एक नवीन विक्रम केला आहे.
टी-२० आशिया चषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
अभिषेक शर्मा – भारत – २०२५ – ३०९ धावा – ६ सामने
मोहम्मद रिझवान – पाकिस्तान – २०२२ – २७६ धावा – ६ सामने
विराट कोहली – भारत – २०२२ – १५३ धावा – ५ सामने
इब्राहिम झादरान – अफगाणिस्तान – २०२२ – १३९ धावा – ५ सामने
बाबर हयात – हाँगकाँग – २०१६ – १३८ धावा – ३ सामने
अभिषेक शर्मा रोहित-विराटच्या मांदियाळीत
अभिषेक शर्माने कमालीच्या धावा करणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला. टी२० स्पर्धेत भारतासाठी २५० धावा करणारा तो तिसरा फलंदाज आहे. यापूर्वी, रोहित शर्माने एकाच स्पर्धेत २५० धावा केल्या आहेत आणि विराट कोहलीने चार टी२० स्पर्धांमध्ये २५० धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा टी-२० आशिया चषकाच्या एकाच हंगामात ३०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला.