scorecardresearch

Premium

Time Out Controversy: अँजेलो मॅथ्यूजच्या वादग्रस्त विकेटवर गौतम गंभीर संतापला, उस्मान ख्वाजानेही उपस्थित केले प्रश्न

Angelo Mathews Time Out : अँजेलो मॅथ्यूजच्या हेल्मेटमध्ये समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे त्याला स्ट्राइक घेण्यास विलंब झाला होता. यावर आता गौतम गंभीर आणि उस्मान ख्वाजाने प्रतिक्रिया दिली आहे.

Absolutely Pathetic Gautam Gambhir Reacts On Angelo Mathews Time Out Controversy in SL vs BAN Match in world cup
अँजेलो मॅथ्यूजच्या टाइम आऊटवर गौतम गंभीरची प्रतिक्रिया (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gautam Gambhir Says Absolutely pathetic what happened in Delhi today: सोमवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ सामन्यात बराच गोंधळ झाला. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज ‘टाईम आऊट’ झाल्याने वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनवर खिलाडूवृत्ती न दाखवल्याने त्याच्यावर टीका होत असतानाच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनीही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

२५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर ही घटना घडली. यानंतर शाकिब अल हसनने मैदानात आलेल्या फलंदाज अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध ‘टाईम आऊट’ची अपील केली. वास्तविक, मॅथ्यूजने सुरुवातीला खराब हेल्मेट आणले होते, ज्यामुळे त्याने हेल्मेट बदलताना चेंडूचा सामना करण्यासाठी विलंब केला. यावर शाकिब अल हसनने टाईम आऊटची अपील केली. यानंतर मैदानावरील पंच माराईस इरास्मस यांनी शाकिबला वारंवार विचारले, तू खरोखरच अपील करत आहेस का? बांगलादेशचा कर्णधार म्हणाला, होय आम्ही अपील करत आहोत. यानंतर इरास्मसने मॅथ्यूजला बाद घोषित केले.

Babar Azam warning to throw a bottle Video Viral
Babar Azam : प्रेक्षकांच्या ‘झिम्बाबर-झिम्बाबर’च्या घोषणांनी बाबर संतापला, बाटली फेकून मारण्याचा दिला इशारा, पाहा VIDEO
R Ashwin Wife Prithi Pens Emotional post
IND vs ENG : ‘५०० ते ५०१ विकेट्स दरम्यान आमच्या आयुष्यात…’ अश्विनच्या कामगिरीबद्दल पत्नी प्रीतीची भावनिक पोस्ट
children dance so gracefully
सलमान, अक्षय, गोविंदालाही टाकले मागे! ढोल ताशाच्या तालावर चिमुकल्यांनी केला भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Gyan Vapi Precincts c. 1870s.
ज्ञानव्यापी आणि शाही इदगाह मशीद: ‘हा’ अधिनियम हिंदू याचिकाकर्त्यांना का रोखू शकला नाही?

गौतम गंभीरने अँजेलो मॅथ्यूजला आउट देण्याच्या निर्णयाचे निराशाजनक वर्णन केले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजानेही प्रश्न उपस्थित केले आहेत. गौतम गंभीरने ट्विटरवर लिहिले की, “दिल्लीत जे काही घडले ते खूपच निराशाजनक आहे.”

हेही वाचा – IND vs SA: १६ वर्षांपूर्वी सौरव गांगुलीबरोबरही असेच घडले होते, सहा मिनिटे उशिरा येऊनही दादा कसा ‘Time Out’ झाला नव्हता?

ऑस्ट्रेलिया फलंदाज उस्मान ख्वाजाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अँजेलो मॅथ्यूज क्रीजवर पोहोचला होता, त्यानंतर त्याचे हेल्मेट तुटले. अशा स्थितीत तो ‘टाईम आऊट’ कसा होऊ शकतो? जर तो क्रीजवर आला नसता, तर मी पूर्णपणे टाईम आऊटच्या बाजूने असतो, पण हे हास्यास्पद आहे. एका फलंदाजाला क्रीजवर पोहोचण्यासाठी तीन मिनिटे लागतात त्यापेक्षा हे वेगळे नाही.”

शाकिबने दाखवली नाही खिलाडूवृत्ती –

सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूज विरोधी संघाचा कर्णधार शाकिब अल हसनशी बोलताना दिसला, पण शाकिबने अपील मागे न घेता अजिबात दया दाखवली नाही. त्यानंतर मैदानावरील पंचांशी बोलूण घेण्सास सांगितले. यानंतर अँजेलो मॅथ्यूज पंचांशीही चर्चा केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्याला तंबूत परतावे लागले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Absolutely pathetic gautam gambhir reacts on angelo mathews time out controversy in sl vs ban match in world cup vbm

First published on: 06-11-2023 at 20:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×