Sourav Ganguly almost became first to be timed out in international cricket: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ३८व्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईम आउट घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा फलंदाज अशा प्रकारे बाद झाला. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण नियम पाळायचे असतील तर पंचांचा दोष नव्हता. मात्र, जेव्हा खेळ भावनेचा विषय येतो, तेव्हा बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनला त्या संदर्भात लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, आता १६ वर्ष जुने प्रकरण समोर आले आहे, ज्यात सौरव गांगुली टाईम आउट होण्यापासून वाचला होता.

दरम्यान, सौरव गांगुली टाईम आउट होणारा पहिला कसोटी फलंदाज होण्याचा थोडक्यात वाचला होता. २००७ मध्ये केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हे सर्व घडले होते. या सामन्यात, जिथे भारताने एक विकेट गमावली आणि पुढचा फलंदाज सचिन तेंडुलकरला खेळपट्टीबाहेर वेळ घालवल्यामुळे मैदानात उतरू दिले गेले नाही आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आंघोळ करत होता, तिथे फलंदाजीला येण्याची जबाबदारी सौरव गांगुलीवर होती. त्यावेळी सौरव गांगुली त्याच्या ट्रॅकसूटमध्ये होता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

या विशिष्ट परिस्थितीत, गांगुलीने फलंदाजीला येण्यासाठी वेळ मर्यादा तीन मिनिटांनी ओलांडली असली तरी, तत्कालीन दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथने अपील न करण्याचा निर्णय घेतला आणि गांगुलीने फलंदाजीसाठी येण्याची संयमाने वाट पाहिली. त्यावेळी सौरव गांगिली सहा मिनिंट उशीरा फलंदाजीला आला होता. मात्र मॅथ्यूजची घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलीच घटना आहे, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजांचा टाईम आउट होण्याचा सहा घटना घडल्या आहेत.

काय आहे टाईम आऊटचा नियम?

एमसीसीच्या नियमावलीनुसार, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाहेर गेल्यानंतर पुढच्या तीन मिनिटांत पुढच्या फलंदाजाने मैदानात थेट क्रीजवर येऊन फलंदाजी करण्यासाठी तयार राहायला हवं. जर यादरम्यान अतिरिक्त वेळेची मागणी पंचांच्या परवानगीने किंवा संमतीने करण्यात आली असेल, तर ते विचारात घेतलं जातं. मात्र, तसं नसल्यास तीन मिनिटांच्या आत फलंदाज सर्व तयारी करून चेंडू खेळण्यासाठी क्रीझवर उपस्थित असायला हवा.

हेही वाचा – SL vs BAN: १४६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, अँजेलो मॅथ्यूज ठरला ‘टाइम आऊट’चा बळी, पाहा संपूर्ण घटनेचा VIDEO

मॅथ्यूजच्या बाबतीत इथेच गोंधळ झाला. मॅथ्यूज मैदानावर आला खरा. क्रीझवरही उभा राहिला. पण नेमकं तेव्हाच त्याला त्याच्या हेलमेटची पट्टी निसटल्याचं लक्षात आलं. त्यावर त्यानं डगआऊटमधून दुसरं हेल्मेट मागवलं. तोपर्यंत बराच वेळ गेला. यादरम्यान शाकिब अल हसननं टाईम आऊटची अपील केली. मैदानावरील दोन्ही पंचांनी नियमाचा आढावा घेतला आणि मॅथ्यूजला बाद घोषित करण्यात आले.

Story img Loader